लोकल रेल्वेतील गर्दीवर उपाययोजनासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करून ठोस उपाययोजना करणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सांगितले. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीवरून कळवा येथे बारावीचा पहिलाच पेपर देण्यासाठी जात असताना मुंब्रा – कळवा स्टेशन दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून सोहम कटारे या विद्यार्थ्याचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. अशा …
Read More »माधुरी मिसाळ यांचा इशारा, मुंबईत वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिला इशारा
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन गंभीर असून, बांधकाम प्रकल्पांसाठी निश्चित केलेल्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. मुंबईतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण मापन यंत्रे बसवणे, धूळ नियंत्रणाचे उपाय करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नात दिली. मुंबईतील वायू …
Read More »आमदार विलास तरे यांची माहिती, २ वर्षात २०० एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय
पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील मनुष्यबळ व बसेस कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पालघर जिल्ह्यासाठी पुढील २ वर्षांत एकूण २०० नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा …
Read More »वरळीतील टेस्टिंग लॅबच्या भूखंडावर बहुमजली रोबोटिक पार्किंग प्रकल्प आणि इमारतीच्या टेंडरची चौकशी सपा आमदार रईस शेख याच्या प्रश्नाला माधुरी मिसाळ यांचे उत्तर तर नार्वेकर यांचे बैठकीचे आश्वासन
बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळीतील महापालिकेच्या टेस्टिंग लॅबच्या जागेवर बहुमजली रोबोटिक पार्किंगसाठी काढलेल्या टेंडरबाबत तसेच ई वार्ड कार्यालय बांधकाम रेंगाळत ठेवल्याबाबत नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली. समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी यासंदर्भात गुरुवारी विधानसभेत तारांकित प्रश्न …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत केली घोषणा
राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा लढवावी लागणार आहे. या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. गांधी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस …
Read More »दादाजी भुसे यांची माहिती, शाळांच्या सुविधा उभारणीसाठी विविध स्रोतांतून निधीचा प्रभावी उपयोग सीएसआर फंड, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी निधी वापरणार
राज्यातील शाळांची भौतिक सुविधा सुधारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी, तसेच मनरेगा अंतर्गत कंपाऊंड वॉलसारखी कामे करता येतात. जिल्हा परिषदेचा सेस निधी, स्थानिक विकास निधी, सेवाभावी संस्था, गौण खनिज निधी, सीएसआर आणि लोकसभा निधी या माध्यमांतूनही शाळांमधील सुविधा उभारल्या जात आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी याबाबत उपस्थित लक्षवेधीचे उत्तर …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बिनशेती झालेल्या मिळकतींवर अकृषिक कर रद्द विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती
राज्यातील बिनशेती झालेल्या मिळकतींवर दरवर्षी आकारला जाणारा अकृषिक कर आकारण्यात येऊ नये, असा निर्णय १० फेब्रुवारी २०२६ च्या सुधारित निर्णयानुसार घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे थकबाकी देखील माफ करण्यात आली आहे. तथापि, २००१ पूर्वी झालेल्या रुपांतरणासाठी तेव्हाच्या रेडी रेकनरनुसार एकरकमी रुपांतरण अधिमूल्य आकारण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्राकडे निवेदन स्फोटक कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी प्रक्रिया ऑटोमेशनवर भर
स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या प्रक्रियेत ऑटोमेशनवर आधारित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि कामगारांचे जीव सुरक्षित राहतील. २००८ मध्ये तयार झालेल्या स्फोटक कारखान्यांसंबंधी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे सविस्तर निवेदन सादर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. महाराष्ट्र विधान परिषद नियम …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, हरवलेल्या महिला शोधण्यासाठी राज्यात स्पेशल सेल गेल्या वर्षभरात सापडलेल्या महिलांच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ
हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने स्पेशल सेल तयार केला आहे. या सेलमध्ये अतिरिक्त महासंचालक (एडीजी) स्तराच्या महिला अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. या शोध मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी ते पाहतात. या विशेष सेलने केलेल्या कामामुळे गेल्या वर्षभरात सापडलेल्या महिलांची संख्या १० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या …
Read More »भाजपाकडून या चार जणांना आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री आठवले, तावडे, वडकुते आणि माया चिंतामण इवनाते यांना उमेदवारी
राज्यसभेवर निवडूण गेलेल्या सात जणांची मुदत नुकतीच संपत आली आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त झालेल्या सात जागांपैकी चार जागांसाठी भाजपाने उमेदवार जाहिर केले. यापैकी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, माजी आमदार रामरावजी वडकुते आणि मायाताई चिंतामण इवनाते यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केली आहे. सात जणांपैकी राज्यसभेवर महाराष्ट्रातून …
Read More »
Marathi e-Batmya