तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाचा वापर वाढवणे काळाची गरज ‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांकडून कृत्रीम बुद्धीमत्ता कौशल्यवृद्धीत सहकार्य
शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका …
Read More »अहिल्यानगरमधील चौंडी येथील एक दिवसाच्या मंत्री परिषदेच्या बैठकीसाठी २ कोटींचा खर्च सर्व मोठी पंचतारांकित हॉटेल्स आणि सरकारी विश्रामगृहे आधीच बुक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महायुती सरकारने मंगळवार, ६ मे रोजी अहिल्यानगर येथील चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी अहिल्यानगरमधील सर्व सरकारी विश्रामगृहे आणि खाजगी हॉटेल्स दोन दिवस आधीच बुक करण्यात आली आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह ३६ …
Read More »प्रताप सरनाईक यांचे निर्देश, निधी वापराबाबत नियमावली करा परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना दिले निर्देश
रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी रस्ता सुरक्षा निधीतून प्राधान्याने घेण्यात येणाऱ्या कामांसह निधी वापराबाबत नियमावली तयार करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात रस्ता सुरक्षा निधीबाबत, ऑटो-रिक्षा व मिटर्स टॅक्सी भाडे नाकारण्याच्या तक्रारीसंदर्भात …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा आरोप, भाजपा, रा. स्व. संघाचे धर्माच्या नावावर विष पसरविण्याचे काम जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल: हर्षवर्धन सपकाळ
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन
पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव – सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …
Read More »हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, … नवा अवतार राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला परभणीतील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्या सोमवारी संविधान बचाव यात्रा
भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि …
Read More »“टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ५ ते ९ मे दरम्यान प्रशिक्षणाची टेकवारी - अपर मुख्य सचिव व्ही.राधा
प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI), ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, कार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली आहे. …
Read More »मुख्यमंत्री पदाचा विषय येताच अजित पवार म्हणाले, शब्दच मागे घेतो म्हणजे विषय संपला १४५ आमदाराचं पाठबळ सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे
काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे झाले उपमुख्यमंत्री पद भूषविणारे अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठीचा योग काही जुळून येत नसल्याचे सांगत खंत व्यक्त केली. त्यावरून महाराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्ये-नेते यांच्याकडूनही यासंदर्भात भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच काय पक्षाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र महोत्सवातही प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी …
Read More »वर्षा गायकवाड यांचा खोचक सल्ला, लाडकी बहिण योजनेसाठी मोदी सरकारकडून पॅकेज आणा आदिवासी, मागास व वंचित समाजाच्या हक्काचा निधी ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी वळवू नका
भाजपा युती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समाजासाठी असलेला निधी वळवला आहे. नियमानुसार या समाज घटकांचा निधी इतर खात्याला वर्ग करत येत नाही, पण भाजपा सरकार सर्व कायदे धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहे. आदिवासी व सामाजिक विभागाचा निधी …
Read More »
Marathi e-Batmya