वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करावा यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांनी सातत्याने फोन करुन दबाव टाकला, असा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. मुस्लिम मतांसाठी हिंदुत्वाचा त्याग करुन उद्धव ठाकरेंनी बाळसाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. वक्फ बोर्ड सुधारणा विरोधी भूमिका घेतल्याने रझा अकादमी, ऑल इंडिया उलेमा बोर्ड …
Read More »पाणंद रस्ते, घरकूल आणि विहिरींसाठी रॉयल्टी फ्री खडी आणि माती गावातील मूलभूत सुविधा बळकट करण्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पाणंद रस्ते, घरकूल आणि विहिरींच्या बांधकामासाठी लागणारी खडी आणि माती रॉयल्टी फ्री उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनानं जारी केला आहे. महसूल आणि वन विभागानं हा शासन निर्णय जारी केला असून, यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा …
Read More »दिनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रकरणी अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत …
Read More »दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल चौकशीसाठी समिती गठित, धर्मादाय रुग्ण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी होत नसल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, …
Read More »अतुल लोंढे यांची मागणी, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा जनतेच्या कराच्या पैशावर उभारलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अद्दल घडवा
पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका,…हि तर सत्तेसाठी अजित पवार यांची लाचारी अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाटला, मुस्लीम समाजाचा केला विश्वासघात
भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत सरकार मध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सोडला नाही असे सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजपा सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातले असल्याचा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी …
Read More »दोडामार्गतील रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करा वनमंत्री गणेश नाईक यांचे वन विभागाला आदेश
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे. तसेच या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातील संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे होणारा त्रासासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. …
Read More »मृत महिला प्रकरणः दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या चौकशी अहवालात भलतीच माहिती भाजपा आमदाराच्या स्वीस सहायकाच्या पत्नीचा मृत्यूप्रकरण
पुणे येथील नळ स्टॉप रस्त्यावरील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील १० ते २० लाख आधी डिपॉझिट भरा असे मगच रूग्णालयात दाखल करू असे मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरने सांगितले. त्यामुळे गरोदर महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे याप्रकरणी भाजपा आमदार अमित गोरखे आणि भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने करत रूग्णालयाची तोडफोड केली. तर शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी …
Read More »सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा
महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आज कौशल्य विकास मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’ करावे ‘जिल्हा नियोजन’मधून निधी मिळणाऱ्या कार्यालयांना इमारतींच्या सौर ऊर्जीकरणाचे निर्देश
राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘ जियो टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या इमारतीचे सौर ऊर्जीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी २२ विभागांच्या …
Read More »
Marathi e-Batmya