राजकारण

उद्धव ठाकरे यांचा टोला, बहिणींमध्ये आवडती नावडती करू नका २१०० रूपये देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करा

राज्य सरकारच्या तिजोरीवर येणाऱा भार कमी करण्यासाठी आता नव्याने सत्तास्थानी विराजमान झालेल्या महायुती सरकारकडून लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची तपासणी करण्यात येत असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच योजनेत नव्याने अटी व नियम लागू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्ष्प्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून, जनतेशी देणेघेणे नाही ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणावर दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडी आक्रमक

ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलित बांधवांवर अत्याचार केले. सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर …

Read More »

भास्कर जाधव यांच्या आक्षेपामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधेयकच मागे घेतले विधेयक आता चर्चेसाठी ठेवणार आता मागे घेतो

राज्यातील महायुती सरकारला संशयातीत बहुमत मिळाल्यानंतर नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणे सुरु होते. तसेच दुपारनंतर काही काळ राज्यातील राज्य सरकारकडून विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या विधेयके विधानसभेत मांडून त्यास मंजूरी देण्याची प्रक्रिया ही अध्यक्षांकडून पार पाडली जात होती. मात्र शिवसेना उबाठाचे …

Read More »

छगन भुजबळ यांचा अजित पवार- पटेल यांना इशारा, उठ म्हंटलं की उठायचं आणि बस… हा भुजबळ तसा माणूस नाही

राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असा वाद रंगलेला असताना त्यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच शेवटपर्यंत लोकसभा निवडणूकीतून उमेदवारी जाहिर करण्यावरून महायुतीने एकंदरीत घोळ घालण्यात आल्याचे दिसून आले. परंतु या प्रकरणावर आतापर्यंत मतप्रदर्शन करण्याचे टाळत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र मंत्री पदाच्या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेने बहुमत दिले का? आजच्या कामकाजावर काँग्रेसचा बहिष्कार

राज्यात महायुती सरकारचे बहुमतात सरकार आले. या सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळाले का असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधकांनी पायऱ्यांवर परभणी आणि बीड प्रकरणी आंदोलन केले. त्यानंतर कामकाज …

Read More »

बीड सरपंच हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केली मागणी

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार ३ आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज २८९ अनव्ये दानवे यांनी सभागृहात मांडली. …

Read More »

विधानसभेत मंत्री उदय सामंत यांच्याकडून पुरवणी मागण्या सादरः लाडक्या बहिणीसाठी १४०० कोटी ३५ हजार ७८८ कोटींच्या मागण्या सादर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी महायुतीने माझी लाडकी बहिण योजनेतील रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने सोमवारी ३५,७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या, ज्यात आपल्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहिण योजनेसाठी १,४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे यावेळी पुरवणी …

Read More »

विधानभवन वास्तूच्या विस्तारासाठी शासकीय मुद्रणालयाची जमीन अधिग्रहित करा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

नागपूर येथील विधानमंडळ वास्तुच्या विस्तारासाठी शासकीय मुद्रणालय, नागपूर मौजे सिताबर्डी येथील ९६७० चौ.मी. जागा विधानमंडळास उपलब्ध करुन देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी आणि विद्यमान हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा असे निदेश विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी आज आपल्या दालनात बोलवलेल्या सर्व संबंधितांच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले. विधान भवन, नागपूर …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, बीड व परभणीच्या घटनांवर राज्यातील जनतेत तीव्र संताप… विरोधकांकडून ईव्हीएम व बीड, परभणीतील मुद्द्यांवर विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीड मधील घटनांचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. …

Read More »

सुप्रिया सुळे यांची मागणी, बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे जनतेने इतक्या विश्वासाने कौल दिला आहे तर लगेच कामाला लागायला पाहिजे

बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला तीन आठवड्यांपासून गृहमंत्री नाहीत. माझी अपेक्षा होती की एवढं मोठं बहुमत जर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांना दिलं आहे तर त्यांनी कामाला लागायला हवं होतं, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी …

Read More »