राजकारण

हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल, भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत मनपा निवडणुकीत ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’ वगनाट्य

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री अँड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरु आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरु असून भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपैया’चे वगनाट्य जोरात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, संतांच्या विचारांमधून सामाजिक व शैक्षणिक कार्याला दिशा संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख

सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माजी मंत्री कृपा शंकर सिंह, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित …

Read More »

व्हेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’ नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

व्हेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे. व्हेनेझुएलातील सद्यस्थिती पाहता, भारतीय नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय त्या देशाचा प्रवास करणे टाळावे, असे आवाहन केंद्र सरकारकडून अधिकृतपणे करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, जे भारतीय नागरिक …

Read More »

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा वचननाम्याच्या निमित्ताने भाजपावर हल्लाबोल महापालिकेच्या ठेवीवरून साधला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा

महापालिकेच्या ठेवीवरून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ठेवू काय चाटायला नसतात असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पलटवार करत म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे ठेवी काय चाटायला नसतात हे अशोभनीय वक्तव्य आहे. मला त्यांना सांगायचं की तुमचं म्हणणं एकदम …

Read More »

निवडणूकीत सरकारचा नवा निर्णय, पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ! राजपत्र जारी

शेतकऱ्यांनी घेतलेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क (Stamp Duty) पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून महसूल व वन विभागाने १ जानेवारी २०२६ रोजी याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले …

Read More »

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल नायगांव येथील सावित्रीबाई फुले यांच्या १९५ वी जयंती कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथे उभे राहणारे स्मारक त्यांच्या कार्याची आठवण देईल, त्यामुळे लढण्याची प्रेरणा तर मिळेलच परंतु समाजातील विषमतेच्या विरोधात क्रांतीची बिजे तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांना अधिकार देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी येथे उभ्या राहणाऱ्या महिला प्रशिक्षण केंद्रात आवश्यक सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाची …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, निवडणूक आयोगाने मनाची तरी बाळगून राहुल नार्वेकरांवर कारवाई करा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे, ते स्वतःला संविधानापेक्षा मोठे समजायला लागले

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करत केलेले वर्तन हा आदर्श आचारसंहितेचा भंगच आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहे. निवडणूक आयोग प्रामाणिक नाही हे दिसत आहे. निवडणूक आयोगाने जनाची नाही तर मनाची तरी बाळगून आतापर्यंत गुन्हा दाखल करायला हवा होता, पण आयोग हा भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे …

Read More »

नवाब मलिक यांचा विश्वास, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रक्रियेवर नवाब मलिकांचा संशय ;राज्य निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

झारखंडमध्ये एक जागा असताना मुख्यमंत्री होऊ शकतो तर ३० जागांवरही राष्ट्रवादीचा मुंबईत महापौर होऊ शकतो असा ठाम दावा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. साडे तीन वर्षांनंतर नवाब मलिक यांची पत्रकार परिषद होणार असल्याने नवाब मलिक माध्यमांशी …

Read More »

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय, संभाजी महाराज समाधीस्थळासाठी अडीच एकर जमीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने, पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील जमीन आता समाधीस्थळसाठी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर हा आज निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील तुळापूर व वढू …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करायच्या याबाबतचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन …

Read More »