राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये २९ जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त २५३ तालुके आणि २०५९ मंडळांमध्ये मदतीसाठी ६५ मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी ३१ हजार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी अदानीला घाबरून पंतप्रधानांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देणे टाळले, विमानतळ उद्घाटनानंतर नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी तरी करणार का?
अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. शेतीच्या नुकसानासोबत शेतकऱ्यांचे घर दार संसार उघड्यावर पडले आहेत परंतु भाजपा महायुती सरकारने मात्र नुकसान भरपाईच्या नावाने फसवणूक केली आहे. लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती रिक्षा व ई बाईक धोरण नियमावली दोन दिवसात प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करावा
ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सीसाठी समुच्चयक धोरण नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होत असून त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवावे. नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करून व्यवसाय वृद्धी करु नये, अशा सूचना परिवहन …
Read More »प्रताप सरनाईक यांचे आश्वासन, एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक कामगारांचा भत्ता, घरभाडे, अन्य थकीत भत्ते, दिवाळी अग्रिम निर्णय घेणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कामगारांच्या विविध मागण्या आहेत. त्या रास्त असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कामगार संघटना सोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र …
Read More »अजित पवार यांचे आदेश, अजिंक्यतारा, संगम माहुली, मालवणचा विकास करताना ऐतिहासिक सौदर्य जपा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपा
साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई, पहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचे जतन आणि संवर्धन, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण, संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या स्थळांच्या परिसराचा पुनर्विकास करताना तेथील परिसर, समाधी स्थळ, प्राचीन वास्तूंचं मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित …
Read More »माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन, अद्ययावत उर्दू घर उभारणार उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय समारोहाचे उद्घाटन
मराठी व उर्दू साहित्यिक देवाणघेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे उर्दू घर योजना आहे. हे उर्दू घर अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. तसेच उर्दू शाळा, वसतिगृहे वाढविण्यासाठी सकारात्मक असल्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. उर्दू साहित्य अकादमीची नवीन समिती लवकरच गठित करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. महाराष्ट्र उर्दू …
Read More »राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची सोडत जाहीर नगराध्यक्ष पदी कोणत्या आरक्षित संवर्गाचा बसणार
राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगर विकास विभागांचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हंम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील २४७ नगरपरिषद पैकी …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, मुख्यमंत्री फडणवीसांनीच फासला हरताळ दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक
राज्यातील जनतेचे वीज बील पुढील पाच वर्षात कमी कमी केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीरपणे सांगितले होते पण मुख्यमंत्री यांनी आपल्याच शब्दाला बगल देत वीज बील महाग केले आहे. दिवाळीच्या तोंडावर केलेली ही वीज दरवाढ सर्वसामान्यांवर टाकलेला बोझा आहे, अशी टीका काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी …
Read More »सचिन सावंत यांचा इशारा, राहुल गांधींबद्दल मनोज जरांगेंनी वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह, मर्यादा पाळा मनोज जरांगेंच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा, आरक्षणाचा लढा खालच्या पातळीवर आणू नये
मनोज जरांगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घ्यावे. मनोज जरांगे यांच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, शेतकऱ्यांसाठी प्रस्तावाची वाट कसली पाहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा मुख्यमंत्र्यांना सुरजागडच्या खाणीतून मिळणाऱ्या मलईतच जास्त रस
राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात असताना त्याला भरीव मदत देण्यास भाजपा युती सरकार उदासीन आहे. महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवला की मदत देऊ हे वेळकाढूपणा व असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करायला हवे होते. शेतकऱ्यांचे सर्वकाही उद्ध्वस्त झाले असताना प्रस्तावाची वाट …
Read More »
Marathi e-Batmya