केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा सुरू झाली. बुधवारी इंडिया आघाडीच्या अर्थात विरोधी पक्षाच्या खासदारांनी अर्थसंकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने कामकाजाला सुरुवात झाली. हा अर्थसंकल्प भाजपातेर शासित राज्यांसाठी भेदभाव करणारा असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या खासदारांनी केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारडे पैसे, पण शेतकऱ्यांसाठी नाही महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा
राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी …
Read More »राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणून मंजूरी घेण्याचे अजित पवार यांचे निर्देश सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या थकीत मुद्दलाची रक्कम राज्य शासन भरणार
राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम संबंधित जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांनी माफ केल्यानंतर थकीत मुद्दलाची रक्कम राज्य शासनातर्फे अदा करण्यात येईल. बंद पडलेल्या आणि अवसायनात निघालेल्या संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तर कार्यरत असलेल्या संस्थांची निम्मी थकबाकी राज्यशासन भरणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणून त्यास मंजूरी घेण्याचा …
Read More »श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ पत्र देण्यासाठी दबाव आणला जात होता. तसेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जमत नसेल तर आदित्य ठाकरे याने दिशा सालियन हिच्यावर बलात्कार केल्याचे शपथपत्र द्यावे असा दबाव आणत नाहीतर तुमच्या विरोधात ईडी लावू असा धाक दाखविला …
Read More »अजित पवार यांचे निर्देश, पुण्यातील वाहतूकीच्या समस्येसाठी तज्ज्ञ प्रतिनिधींची समिती पुणे शहराचे झपाट्याने नागरिकरण होतेय
शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, औद्योगिक संधींचे शहर म्हणून पुणे शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळात वाहतूक कोंडीमुक्त शहर म्हणून शहराची ओळख निर्माण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येचा उपमुख्यमंत्री अजित …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा दावा, अर्थसंकल्पातून राज्यासाठी निधी मिळाला संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीच मिळाले नसल्याची टीका विरोधकांकडून एकाबाजूला करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला केंद्रीय अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याचा दावा करत विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प हा अतिशय …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय मेढपाळ, एमआयडीसीसाठी जमिन आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
जवळपास दोन आठवड्यानंतर राज्याच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत धनगर समाजासाठी राबविण्यात येणाऱी योजना अशीच पुढे सुरु ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेत शेत पिकांच्या नुकसानीची मोजणी करण्यासाठी अदयावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेत नाशिक मधील एमआयडीसीसाठीही १६ …
Read More »दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये ४ टक्के आरक्षण ३० जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ …
Read More »आधीची आश्वासने हवेत आता आशा सेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविकांना विमा कवच अपघाती मृत्यूसाठी दहा लाख, अपंगत्वासाठी पाच लाख रूपयांचे विमा
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये इतका निधी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवारांना सहभागी होण्यासाठी आमंत्रण छगन भुजबळ यांच्यानंतर शरद पवार यांना आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यांच्या सहभागी होण्याची मी वाट पाहत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून …
Read More »
Marathi e-Batmya