राजकारण

उद्धव ठाकरे, इंडी आघाडी मुस्लिम लीगचीच भाषा बोलताहेत

उद्धव ठाकरे, इंडी आघाडी सध्या मुस्लिम लीगचीच भाषा बोलत असून उद्धव ठाकरे, इंडी आघाडीला मत म्हणजे व्होट जिहादच्या समर्थकांना मत देण्यासारखे आहे, अशी अशी जळजळीत टीका भारतीय जनता पार्टीचे आ. नितेश राणे यांनी रविवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. राणे बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून ते …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला ओडिशातील रत्नभांडारचा मुद्दा

लोकसभा निवडणुकीत एनडीए ४०० जागांचा टप्पा पार करणार आणि ओडिशामध्ये डबल इंजिन सरकार बनणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. ५० जागाही मिळवू न शकणारी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विरोधी बाकावर देखील बसू शकणार नाही अशी खिल्लीही पंतप्रधान मोदी यांनी उडवली. ओडिशातील कंधमाल, बोलंगीर आणि बरगढ …

Read More »

मेहबुबा मुफ्ती यांचा आरोप, निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्या…

लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर पुलवामा जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आली होती आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेतल्याचा दावा पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी केला. जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी १३ मे रोजी मतदान होणार असलेल्या पुलवामामध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊन आणि ताब्यात घेऊन निवडणुका …

Read More »

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे भक्त) प्रत्येक रस्त्यावर फिरत आहेत. आपला भाऊ “तोफ” असल्याच्या ओवेसींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणा म्हणाल्या की अशा “तोफ” त्यांच्या घराबाहेर सजावटीसाठी ठेवल्या आहेत. ती एका सैनिकाची मुलगी असल्याचे सांगत नवनीत राणा म्हणाल्या की, “आम्ही बाहेर …

Read More »

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरील चर्चेचे निमंत्रण स्विकारले

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या जाहीर चर्चेचे निमंत्रण औपचारिकपणे स्वीकारले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन बी लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ए पी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी चर्चेचे निमंत्रण दिले. या तिघांनी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना २०२४ …

Read More »

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये कुठल्याही प्रलोभनाच्या अवैध वस्तूची वाहतूक करण्यास आदर्श आचारसंहितेअंतर्गत निर्बंध आहे.राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. राज्यस्तरावरून मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा स्तरावरून जिल्हा निवडणूक …

Read More »

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले. पुढील वर्षी पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे होत आहेत आणि १७ सप्टेंबर (पीएम मोदींचा वाढदिवस) हा त्यांचा कार्यालयातील शेवटचा दिवस असेल, या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना अमित शाह …

Read More »

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान होत आहे. तत्पूर्वी चवथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असतानाच संभाजी नगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्ये आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये समोरासमोर येत परस्पर विरोधी घोषण देऊ लागले. मात्र उशीराने का होईना पोलिसांनी हस्तक्षेप करत …

Read More »

प्रियांका गांधी यांचा टोला, पंतप्रधान मोदींनी धाडस काय असते ते इंदिरा गांधींकडून शिकावे

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा प्रचार आहे. येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच महाराष्ट्रातील बीड आणि नंदूरबार लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ नुकताच पार पडला. या दौऱ्यात नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीला …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी या मतदारसंघात मतदान

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होत असून असून निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी प्रत्यक्ष निवडणूककरिता लागणारे साहित्य, साधनसामुग्री मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »