राजकारण

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये संभ्रम “इकडे की तिकडे?” दोन नेत्यांची बाजू घेण्याऐवजी गैरहजर राहणेच बरे असे समजून गैरहजर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वा विरोधात त्यांचेच पुतणे तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन भाजपा-प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देत सहभागी झाली. आतापर्यंत शरद पवार यांनी आपल्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त करत अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भूमिका …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल, शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त अपुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी

राज्यातील भाजपा प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेत पाठिंबा दिला. त्यानंतरचे शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन होत आहे. मात्र आता विरोधी पक्षनेत्यानेच आपल्या पदाचा राजीनामा देत सरकारमध्ये सहभागी झाल्याने विरोधकांची थोडी गोची …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात… काँग्रेसची लढाई भाजपा सरकारविरोधात; जे पक्ष साथ देतील त्यांना बरोबर घेऊन लढणार

पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन भाजपाप्रणित शिंदे सरकारला काँग्रेस पक्ष प्रश्न विचारेल. शेतकरी, कामगार, गरिब, महिला, कायदा व सुव्यवस्था, महागाई, तरुणांचे प्रश्न आहेत. राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांना शेतकरी व जनतेच्या प्रश्नांची त्यांना चाड नाही. महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे, यासह जनतेच्या महत्वाच्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची टीका, विरोधकांचे पत्र नव्हे ग्रंथच… जितक्या लक्षवेधी आलेल्या आहेत त्यातील मुद्दे उचलून पत्र पाठविलेले दिसते

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे हे पहिलेच तर शिंदे-फडणवीसांचे दुसरे पावसाळी अधिवेशन आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे-फडणवीस-पवार सरकारने प्रथेप्रमाणे विरोधकांना चहापान कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मात्र राज्यासमोरील प्रश्नांची यादी वाचून दाखवित दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत असा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर विरोधकांनी पत्र पाठवित बहिष्कार टाकला. चहापानानंतर सह्याद्री अतिथीगृहात सत्ताधारी मुख्यमंत्री …

Read More »

फडणवीसांनी उल्लेख केलेल्या शिंदे सरकारला लिहिलेल्या विरोधकांच्या पत्रात आहे तरी काय? वाचा तर मग या कारणामुळे चहापनावर टाकला बहिष्कार

राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवार यांच्या रूपाने तिसरे इंजिन लागलेले असतानाही वेगवान निर्णय गतिमान सरकार या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजाणी होताना दिसत नाही. तसेच मागील एक वर्षाच्या कालावधीत शिंदे-फडणवीस-पवार सरकारने वारेमाप घोषणा केल्या. मात्र त्या घोषणांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचबरोबर राज्यातील कायदा-सुव्यवस्था आदींसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अंबादास …

Read More »

“कलंकित व घटनाबाह्य” सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्ला

सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य व कलंकित सरकार, शेतकरी विरोधी, लोक विरोधी सरकार हे राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यास सपशेल अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केले. या असंवैधानिक सरकारने पावसाळी अधिवेशन पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाच्या वतीने बहिष्कार घालण्यात येत असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी …

Read More »

अजित पवार गट आणि शरद पवार भेटीत काय झाली चर्चा? जयंत पाटील यांनी दिली ही माहिती आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचा जयंत पाटील यांचे प्रतिपादन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करत राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांनी आज अचानक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची भेट घेतली. यावेळी बंडखोर गटाचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकर, तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी …

Read More »

अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, …मला वाटत नाही काही राजकिय समिकरणं तयार होतील का याची कल्पना नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरु होणार असतानाच आज रविवारी एक दिवस आधीच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ९ मंत्र्यांच्या गटाने शरद पवार यांची वाय.बी.चव्हाण …

Read More »

अजित पवार गटाच्या अचानक भेटीवर जयंत पाटील म्हणाले, मला सुप्रिया सुळेंचा फोन… सर्वविरोधी पक्षाच्या बैठकीत जयंत पाटील यांना फोन आल्याने पाटील, आव्हाड तातडीने वायबी चव्हाण सेंटर

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरु होत आहे. तत्पूर्वी आज राज्य सरकारने प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम ठेवला आहे. तर दुसऱ्याबाजूला विरोधी पक्षांनी राज्यातील विविध प्रश्नावर राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्यासाठी रणनीती ठरविण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधान भवनातील दालनात बैठक पार पडली. मात्र ऐन बैठकीत शारद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा, … ७५ लाख लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य फडणवीस म्हणाले, उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू, तर अजित पवार म्हणाले, विकासासाठी निधी देणार

शासन आपल्या दारी अभियान हा शासकीय कार्यक्रम राहिला नसून लोकचळवळ बनली आहे. या अभियानामुळे लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला आहे. राज्यातील ७५ लाख लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर या अभियानाच्या माध्यमातून हास्य फुलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कष्टकरी बांधकाम कामगार, बचतगटाच्या महिला, …

Read More »