रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना भाजपाप्रणित शिंदे सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे दाखल करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर सरकारलाही जशास …
Read More »शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांनी ठोठावला ३ रूपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केला दावा दाखल
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शिरसाट अलिकडेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंबद्दल बोलत असताना त्यांनी एक बेताल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आज २७ एप्रिल रोजी संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात सुषमा अंधारे यांनी शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला. सुषमा …
Read More »विनायक राऊत यांचा हल्लाबोल, माळरानाच्या दगडाची अन् करवंदीच्या…. महिला आंदोलकांना हाकलून लावले
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू गावात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी कठोर विरोध केला. माती परिक्षणाकरता अधिकारी आले असता त्यांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. यावेळी ग्रामस्थांनी तेथे आंदोलन छेडले. मात्र, यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, या आंदोलकांना अटकही करण्यात आली होती. याप्रकरणी कोकणातील खासदार विनायक …
Read More »राज ठाकरेंच्या त्या सल्ल्यावर अजित पवार यांचे प्रत्युत्तर, काकाकडे जसं लक्ष… शरद पवारांच्या त्या वक्तव्याचा अर्थ नव्या चेहऱ्यांना संधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना काय सल्ला द्याल असा सवाल केला. यावर राज ठाकरेंनी अजित पवारांना …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, कर्नाटक मुख्यमंत्रीपदासाठी २५०० कोटींचा लिलाव, मोदीजी उत्तर द्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर काँग्रेसचे सर्व प्लॅन तयार, योग्य वेळी निर्णय घेऊ
केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने मागील ९ वर्षात जनतेसाठी काहीही केलेले नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून देशाची संपत्ती विकून देश चालवणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदाच पाहिला. नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा देशातील जनतेला आता कळाला असून नरेंद्र मोदी हे, ना हिंदूंचे आहेत, ना मुस्लीमांचे, …
Read More »मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा १ मे, महाराष्ट्र दिनी होण्यासाठी प्रयत्न करा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे राज्य सरकारला पत्र
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्र दिनीच ही घोषणा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य …
Read More »संजय राऊत यांनी केली ईडी कारवाई, फडणवीस आणि सोमय्यांची पोलखोल मी वेळ मागितली की देवेंद्र फडणवीस पळून जातात
पुण्याच्या दौंड तालुक्यातील वरवंड येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलखोल सभा आज घेतली. या सभेत बोलताना संजय राऊतांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच हे सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी संजय राऊत यांनी त्यांना …
Read More »शरद पवार यांचा मुंबई मनपा आयुक्तांना तात्काळ कॉल आणि ५० हजार विद्यावेतन मंजूर २४ तास सेवा, विद्यावेतन मात्र १५ हजार; इंटर्नशिप करणारे निवासी डॉक्टर शरद पवारांच्या दारी...
मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेली कित्येक वर्षे इंटर्नशिप करणार्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ५० हजार रुपये वाढ व्हावी यासाठी आज बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनच्या निवासी डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेत निवेदन दिले. दरम्यान शरद पवार यांनी मुंबई आयुक्त इक्बालसिंग चहल यांना कॉल करत या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन …
Read More »एक लाख मराठा युवक उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे प्रतिपादन
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्य सरकारच्या सहकार्याने १ लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे , अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजपा नेते नरेंद्र पाटील यांनी दिली . भाजपा प्रदेश कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. बुधवारी …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती; राऊत हे पत्रकार, ते तुम्हा पत्रकारांना अधिक माहित उध्दव ठाकरे यांच्याशी अद्याप या विषयावर चर्चा नाही
दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हाचलाची सुरू आहेत, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात बरीच चर्चा रंगली. त्यातच, मुख्यमंत्री सध्या साताऱ्यात असल्याने ते नाराज होऊन साताऱ्यात गेले असल्याच्या चर्चांनाही जोर आला आहे. त्यामुळे संजय राऊतांनी केलेला गौप्यस्फोट खरा ठरतोय की काय अशी …
Read More »
Marathi e-Batmya