देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतीगृह संकुलाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते …
Read More »शरद पवार म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नव्या क्षेत्रातील परिवर्तनाची दिशा भारती विद्यापीठ देईल
आरोग्य विषयक नव्या सुविधा निर्माण करताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारती विद्यापीठासारख्या संस्था हे करू शकतील. जगात नवनवे संशोधन होत आहे, बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान निर्माण होत आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन समृद्ध पिढी घडविण्याचा प्रयत्न होत आहे. संशोधनात लक्ष केंद्रीत करून देशासमोरचे प्रश्न सोडविण्याला हातभार …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला साताऱ्यातील कांदाटी खोरे, पर्यटन विकास व पोलीस विभागाचा आढावा पर्यटनवाढीसाठी आराखडा करुन प्रभावी अंमलबजावणी करा
कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश …
Read More »राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरून विनायक राऊत म्हणाले, सुपारी घेऊन बोलायचा धंदा प्रकल्प गुजरातला नेल्याचे राज ठाकरेंकडून समर्थन
मागील काही दिवसांमध्ये राज्यात येणारे अनेक उद्योग गुजरातसह अन्य राज्यांत गेले. महाराष्ट्रात होणारी कोट्यवधींची गुंतवणूक परराज्यात गेली. याच मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत होते. हा वाद मागे पडलेला असतानाच राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यास काहीही नुकसान होणार नाही, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न मध्यान्ह भोजनाचा तांदूळ पुरविण्यात केंद्र सरकार असमर्थ
यवतमाळ, जळगाव, पुणेसह सांगली जिल्ह्यातही मध्यान्ह भोजनासाठी लागणारा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ ठरत आहे असा आरोप करतानाच शिल्लक तांदूळ अथवा उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर शाळा प्रशासन करत आहेत, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत केंद्राचे लक्ष वेधले. जयंत पाटील पुढे आपल्या ट्विटमध्ये …
Read More »राज ठाकरेंच्या त्या समर्थनावर अजित पवार म्हणाले, त्याचे समर्थन करत असेल तर दुर्दैवी गुजरातमध्ये उद्योग जाण्याचे राज ठाकरेंकडून समर्थन
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे उद्योग प्रकल्प गुजरातमध्ये गेले. त्याचबरोबर तेलंगणामध्येही गेले. या उद्योग जाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. पण, याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे राज्यातून …
Read More »मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, राष्ट्रध्वजाची जागा भगवा झेंडा घेईल भारत हा धर्मनिरपेक्ष देश पण आता गोडसेंचा देश बनवला जातोय
काही वर्षापूर्वी भाजपाने पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती करत जम्मू काश्मीर मध्ये सरकार स्थापन केले. मात्र कालांतराने भाजपा आणि पीडीपीमध्ये राजकिय मतभेद झाल्यानंतर ही युती संपुष्टात आली. त्यातच जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पीडीपीकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांनी भीती व्यक्त करत म्हणाल्या, …
Read More »राम मंदीरांवरून खर्गे यांचा सवाल, अमित शाह कोण आहेत? पुजारी की महंत मंदीर उद्घाटनाची तारीख जाहीर करण्यावरून मल्लिकार्जून खर्गेंचा सवाल
त्रिपुरा येथील भाजपाच्या ‘जनविश्वास’ यात्रे दरम्यान बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्या येथे निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख १ जानेवारी २०२४ असल्याचे जाहीर केले. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अमित शाहांवर टीकास्र सोडले असून राम मंदिराचे उद्घाटन करणारे तुम्ही कोण? असा सवाल केला. काँग्रेसची भारत जोडो …
Read More »सुप्रिया सुळेंनी अजित दादाबद्दल वक्तव्य करत फडणवीसांना करून दिली त्या गोष्टीची आठवण अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात, तर फडणवीसजी तुम्हालाही मुलगी आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजपाने अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवित त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या यांनी अजित पवारांच्या कामाचे कौतुक करत कधी कधी अजित …
Read More »बच्चू कडू यांचा घरचा आहेर, उगीच फुल काढायचं आणि खिशात ठेवायचं करू नका शिंदे-फडणवीस सरकारला दिला खोचक सल्ला
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न होऊन सहा महिने झाले. तर पहिल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार महिने झाले. पहिल्यांदा झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण मंत्र्यांची संख्या २० इतकी झाली असून अद्यापही २४ मंत्री पदे रिक्त आहेत. मात्र अद्याप दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नसल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये संदोपसुंदी सुरु आहे. त्यातच मागील काही …
Read More »
Marathi e-Batmya