राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि दिवाळी सणाच्या अनुषंगाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यातील बहुतांष निर्णय हे राज्यातील नागरिकांना आपलेसे करण्यासाठी घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. यातील सगळ्यात मोठा निर्णय हा नोकरभरतीतील परिक्षेसाठीचा आहे. त्यानंतर सध्या मुदत पूर्ण केलेल्या गाड्याच्याबाबत, आंदोलकांवरील खटले मागे …
Read More »गाड्यांचे ऐच्छिकरित्या स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंड माफ
ऐच्छिकरित्या वाहनांचे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंड माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा देणाऱ्यांमार्फत स्क्रॅप करण्यात येणाऱ्या वाहनांचा थकीत असणारा मूळ मोटार वाहन कर वसूल करून त्यावरील व्याज …
Read More »भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासाः कर्जमाफ भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ९६४ कोटींची कर्जमाफी
भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४,७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा तसेच ही रक्कम भूविकास बँकेकडून शासनास येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६९ हजार हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकांच्या …
Read More »राज्य सरकारच्या ७५ हजार रिक्त जागांसाठी या दोन संस्था घेणार परिक्षा
मागील अनेक वर्षापासून राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये रिक्त असलेल्या एक लाख ५० हजार जागांपैकी ७५ हजार भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या रिक्त जागा भरण्यासाठी घेण्यात येणारी परिक्षा एमकेसीएल मार्फत घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने सरकारने घेतला होता. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने आता या ७५ हजार जागांसाठी दोन संस्थांची नेमणूक कऱण्याचा …
Read More »नाना पटोलेंचा आरोप, ओला दुष्काळ जाहीर करण्यास शिंदे-फडणवीस सरकारची टाळाटाळ
राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाने पुरता खचलेला असताना त्याला मदत देण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकार फारसे इच्छुक दिसत नाही. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतपीके वाया गेली आहेत हे सरकारला दिसत नाही का? दिवाळीच्या तोंडावर सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल अशी अपेक्षा होती परंतु शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्याबाबतीत असंवेदनशील व शेतकरीविरोधी असल्याने ओला दुष्काळ …
Read More »देशमुखांनी शिवबंधन हाती बांधताच उध्दव ठाकरे म्हणाले, तारीख ठरवा मी येतो पक्ष विस्ताराच्या दृष्टीकोनातून उध्दव ठाकरे यांची मोठी घोषणा
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी आता पक्षविस्तार करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला असून आज संजय राठोड यांचे कट्टर विरोधक संजय देशमुख यांनी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, मी …
Read More »विद्यार्थ्यांना शपथ देत मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करणार
राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांसह मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी …
Read More »अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा वाढविली
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाखावरून १५ लाख करण्यात आल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची …
Read More »मनरेगा आणि राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून ग्रामसमृद्धी
राज्यात मनरेगा आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या समन्वयातून आणि विविध यंत्रणांच्या मदतीने ‘वंचितता निर्मूलन मिशन’ आणि ग्राम समृद्धी साध्य करण्यात येणार असल्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेविषयी आयोजित विविध उपक्रमांच्या मंत्रालयात आयोजित सादरीकरणाच्या वेळी मंत्री भुमरे बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजनेचे …
Read More »काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे, ७८९७ मतांनी विजय
बिगर गांधी घराण्यातील कॉग्रेस पक्षाध्यक्ष होण्याची ही पहीलीच वेळ नाही यापुर्वी पी.व्ही नरसिंहराव हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र त्यावेळी अध्यक्षपदासाठी निवडणुक झाली नव्हती. गेली दहा वर्षात काँग्रेसची देशात झालेली पिछेहाट पहाता नेतृत्वाकडे बोट दाखविण्याचा प्रकार या देशात नवीन नाही हे पहाता काँग्रेसने अध्यक्षपदासाठी निवडणुक घेतली यामध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मलिकार्जुन …
Read More »
Marathi e-Batmya