राजकारण

राहुल गांधींचा निशाणा, मोदी सरकारमध्ये उद्योगपतींचे कर्ज दोन मिनीटात माफ पण…

केंद्रातील भाजपाचे सरकार जनतेमध्ये द्वेष, हिंसा ,भीती पसरवत असून त्याच्या विरोधात ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. भाजपा व आरएसएस देशभरात भीतीचे वातावरण बनवत आहेत. जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे. शेतकरी पहाटे 4 वाजता कामाला सुरूवात करतो, घाम गाळतो पण शेतमालाला भाव मिळत नाहीत. पीकविम्यासाठी खाजगी कंपन्यांना हप्ता …

Read More »

युनिसेफ -उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार

जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात लाख तरुणांना हवामान बदलाचे योद्धे म्हणून कार्य करण्याची संधी आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले केंद्रीय मंत्र्यांना मोदी सरकारकडून मदत मिळतेय

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये राज्याने प्रभावी आणि पथदर्शी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. दरम्यान, केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या पूर्ततेसाठी भरीव सहाय्य मिळत असून, राज्यातील विविध योजना केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण करण्यास प्राथमिकता दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट …

Read More »

रिदा रशीद यांचा सवाल, आ.आव्हाडांच्या कृत्याबद्दल खा.सुप्रियाताई, चाकणकर गप्प का?

राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यातील एका फ्लायओव्हरच्या उद्घाटनावेळी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खा.सुप्रियाताई सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपलीताई चाकणकर या गप्प का, त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे असा सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, आव्हाडांची समजूत काढली पण…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा भाजपाच्या महिला कार्यकर्त्यीने नोंदविल्यानंतर आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहिर केले. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तातडीने आव्हाड यांच्या घरी पोहचत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जितेंद्र आव्हाड हे राजीनामा देण्याच्या मुद्यावर ठाम असल्याची माहिती …

Read More »

भाजपा म्हणते, नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाडांना पक्षातून निलंबित करा

राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी भाजपार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुणे येथे केली. जितेंद्र आव्हाड यांच्या गुन्ह्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई …

Read More »

भारत जोडो यात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले केरळचे ‘बँड पथक’

लष्करी संचलनाप्रमाणे बिगुल, कवायतीची धून, ताशाचा कडकडाट आणि त्या तालावर अत्यंत शिस्तबद्ध रीतीने ‘लेफ्ट-राईट- लेफ्ट’ करत जाणारे “स्वर्गधारा बँड पथक” भारत जोडो यात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. यात्रेत या 14 जणांच्या बँड पथकाला निश्चित असे स्थान आणि ओळख आहे. सर्वात पुढे या पथकाचे संचलन असते आणि मागे त्याच तालावर पाऊले …

Read More »

अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा भ्याड प्रकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यीकडून पोलिसांमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल केली. तसेच सदर घटनेचा व्हिडिओही ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की,  लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा अशी …

Read More »

आव्हाडांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हाः रिदा रशीद यांनी व्हिडिओ केले व्हायरल

ठाणे-कळवा दरम्यान असलेल्या तिसऱ्या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत काल पार पडले. त्यानंतर रात्री कार्यक्रम पार पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांची निघताना एकच गर्दी झाली. या गर्दीत जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केल्याने एकच खळबळ उडाली. …

Read More »

अजित पवार म्हणाले, कोण काय बोलतं? कोण कोणाबरोबर जातं? कोण काय करत…

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे कृशीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शरद पवारांवर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला होता, असे वक्तव्य केले. या साऱ्या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार कुठे आहेत? …

Read More »