राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. …
Read More »सकाळी ७.३० वाजल्यापासून चौकशी, दुपारी ३ च्या सुमारास मंत्री मलिकांना ईडीकडून अटक पहाटे ४ वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहोचले
मागील काही दिवसांपासून भाजपा नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या कोठडीत जाण्याच्या रांगेत असल्याचे सांगत होते. तसेच ईडीची कारवाई लवकरच होणार असल्याचा इशाराही देत होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचत मलिक यांना ईडी कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानंतर …
Read More »उपमुख्यमंत्री पवारांची यशस्वी मध्यस्थी: कर्मचारी संपाबाबत निर्णय उद्या जाहीर करणार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या रास्त, न्याय्य, व्यवहार्य मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्याची ग्वाही
कर्मचाऱ्यांच्या हक्काचा विचार करताना राज्यंही चालले पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्याच्या हिताचा विचार करुन उद्यापासूनचा प्रस्तावित संप मागे घ्यावा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून उपमुख्यमंत्र्यांनी केलेली यशस्वी मध्यस्थी आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रस्तावित संप मागे घेण्याची तयारी असल्याचे, मात्र त्यापूर्वी कर्मचारी संघटनेतील सहकारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संप …
Read More »संपामुळे झालेले नुकसान एसटी कामगारांकडून वसुल करणार नाही महामंडळाचा कोणताही निर्णय नाही- एसटी महामंडळाची स्पष्टोक्ती
एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसुल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्टपणे सांगितले. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून …
Read More »शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू होणार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना शासन सकारात्मक- राज्य वित्त मंत्री शंभुराज देसाई
राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचा-यांच्या कुटूंबाला निवृत्ती वेतन आणि वैद्यकिय कारणास्तव कर्मचा-याने निवृत्ती घेतल्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करणे. तसेच केंद्र शासनाच्या सेवानिवृत्ती योजनाप्रमाणे राज्य शासनाच्या कर्मचा-यांनाही योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यासगटाद्वारे साकल्याने विचार करून शासनास शिफारस करण्यात येणार असल्याचे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. राज्य …
Read More »दिशा सालियानच्या कुटुंबियांच्या आवाहनानंतरही चंद्रकांत पाटील यांचे भाकित मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून केलेल्या आरोपानंतर व्यथित झालेल्या दिशा सालियनच्या कुटुंबियानी आम्हाला शांतपणे जगू द्या, मुलगी गेल्याचे दु:ख काय असते ते तुम्हाला नाही कळणार, या सततच्या आरोपामुळे आम्हालाही काही करून घ्यायची इच्छा होत असून जर आमच्या जीवाला काही झाले तर त्यास जबाबदार हेच लोक राहतील असा …
Read More »दिशा सालियनबाबतचे ते वक्तव्य नारायण राणेंच्या अंगलट राज्य महिला आयोगाची बजावली नोटीस
दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय नारायण राणे यांनी शिवसेनेला इशारा देताना दिशा सालियन हीच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप करत त्यावेळी कोणत्या मंत्र्यांची लाल दिव्याची गाडी तेथे हजर होती असा सवाल करत संशयाची सुई शिवसेनेच्या मंत्र्याकडे केली. त्यास ४८ तासाचा अवधी उलटत नाही, तोच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याची दखल …
Read More »स्व.गणपत आबा देशमुखांनंतर आता शिवसेनेच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा सांगोल्याचा विकास करण्यासाठी इथे राष्ट्रवादी अधिक प्रभावी करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
गणपतराव देशमुख यांना पाठिंबा देण्याचे काम अनेक वर्षे या सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादीने केले. त्यांनी तपस्वी म्हणून काम केले. मात्र त्यांच्यानंतर आता या मतदारसंघात अधिक प्रभावी काम करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे येथील …
Read More »फडणवीस म्हणाले, भाजपाचा भगवा छत्रपतींचा भगवा झेंडा सुरक्षित ठेवणार शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
काही लोक केवळ भगवा मिरवतात पण पाठीमागे कोणकोणासोबत जाताय हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे छत्रपतींचा भगवा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भाजपावर आलेली असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेला टोला लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे कार्यकर्ता मेळाव्या बोलताना शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा …
Read More »भाजपा नेत्यांना नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रापेक्षा मोठे वाटतात महाराष्ट्राची माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार-अतुल लोंढे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना महाराष्ट्राने कोरोना पसरवला असे म्हणून महाराष्ट्राचा अपमान केला. या अपमानाबद्दल मोदींनी माफी मागावी यासाठी काँग्रेसचे आंदोलन असून काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे वाटत आहेत, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल …
Read More »
Marathi e-Batmya