राजकारण

फडणवीस म्हणाले “पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी मागे रॅशन्लीस्ट” गोव्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला दावा

मराठी ई-बातम्या टीम पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षा प्रश्नाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत याप्रकरणी एका समितीची स्थापनाही केली. त्या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच पंतप्रधानांच्या त्या दोऱ्यात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आली होती अशी माहिती तेथील अधिकारीच देत असल्याचा दावा भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. गोवा …

Read More »

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनाने घेतला हा निर्णय दोन शिफ्टमध्ये चालणार काम

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता विधान भवनाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरु राहणार आहे. यासंदर्भातील आदेशही विधानभवन प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचे सर्व प्रश्न विधानभवनाकडून …

Read More »

शरद पवार असतील… यांच्या कुठल्याही विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांचा टोला

मराठी ई-बातम्या टीम पाच राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेश, गोव्यात सत्तांतर होणार असल्याचे भाकित केल्यानंतर भाजपा नेते तथा गो‌व्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार असतील किंवा मोठे नेते असतील, यांची अडचण अशी आहे की यांच्या कुठल्याही विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही. …

Read More »

भाजपाच्या टीकेवर छद्मी हसून पवारांनी दिले उत्तर राज्याचे निर्णय मुख्यमंत्रीच घेतात

मराठी ई-बातम्या टीम एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी मदत केली. त्यावरून भाजपाने शरद पवार हे कोणत्याही संविधानिक पदावर नसताना बैठका कशा घेतात अशी टीका करत पवार हे मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिलाय का? अशी खोचक टीका केली. यासंदर्भात राष्ट्रवादी …

Read More »

उत्तर प्रदेश, पंजाबबाबत पवारांचे भाकित तर पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून व्यक्त केले “हे” मत गोव्यात मविआचा प्रयोग तर मणिपूरमध्ये ५ जागा लढविणार

मराठी ई-बातम्या टीम देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणकोणत्या राज्यात निवडणूका लढविणार आणि भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज बॅलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील निवडणूकाबाबत भाकित केले …

Read More »

वर्षा गायकवाड यांची घोषणा, थांबलेले शिक्षण पुन्हा सुरु होणार : परिक्षा नियोजित वेळेतच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार

 मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर १४ फेब्रुवारी पर्यत राज्यातील पहिली ते १२ वी पर्यतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत शाळांच्या विद्यार्थ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. यापार्श्वभूमीवर राज्याच्या …

Read More »

केंद्रीय मंत्र्यांबरोबरील बैठकीनंतर मंत्री टोपे म्हणाले, पॉझिटीव्हीटी दर जास्त पण… सर्वांसाठी विलगीकरणाचा कालावधी एकच

मराठी ई-बातम्या टीम   जवळपास दोन तास केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याबरोबर झालेल्या सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती देताना म्हणाले की, काही राज्यांमध्ये गृह विलगीकरणाचा कालावधी वेगवेगळा होता. त्यामुळे आता सर्व राज्यात एकच विलगीकरणाचा कालावधी राहणार असून तो सात …

Read More »

यशस्वी शिष्टाईनंतर शरद पवार म्हणाले…तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या होतील ज्यांना राजकारण करायचे त्यांनी करावे मात्र माझ्यासाठी प्रश्न सुटणे महत्वाचे

मराठी ई-बातम्या टीम दोन महिन्याहून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचे सुरु झालेले आंदोलन अखेर संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याप्रकरणी यशस्वी शिष्टाई केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांच्या कृती समितीने कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करत सदावर्ते यांना वकिल म्हणून नियुक्त करून चुक झाल्याची कबुलीही …

Read More »

बैठकीनंतर मंत्री परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले “हे” आश्वासन कामावर हजर राहील्यास कारवाई नाही

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांची कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी जर कामावर परत आले तर …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले विश्वासात घेतलं जात नाही, तर आरोग्य मंत्री टोपे म्हणाले… भाजपाच्या टीकेवर राजेश टोपेंचे चोख उत्तर

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले राज्यात विरोधी पक्षांना विश्वासात घेतले जात नाही. राज्य सरकारकडून सगळी मनमानी सुरु असल्याचा आरोप केला. त्यावर राज्याचे आरोग्य मंत्री म्हणाले की, असे नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेवूनच काम करण्यात …

Read More »