पालघरचे खासदार वनगा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

नवी दिल्लीः प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेशातील आदीवासी समाजबांधवाचे नेतृत्व करणारे पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे आज सकाळी हृदयविकारचा झटका आला. मात्र त्यांना रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

वनगा हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या वनवासी कल्याण केंद्राचे पदाधिकारी होते. तसेच प्रगती प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आदीवासीं विविध प्रश्नावर काम करत होते. चिंतामण वनगा हे सर्वप्रथम १९९६ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकीत विजयी झाले. त्यानंतर १९९९, २०१४ साली ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडूण गेले.

खासदार असूनही ते अत्यंत साधेपणाने रहात. तसेच त्यांचे वागणे अत्यंत निस्पृह असे होते. त्यामुळे ते आदीवासी बांधवाबरोबरच इतर व्यक्तींमध्ये सहजपणे मिसळून जात. त्यामुळे साधी राहणीचे पालघरचे खासदार म्हणून ओळखले जात होते.

भारतीय जनता पार्टीचे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने पक्षाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी अर्पण केली.

खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

याबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही खासदार वनगा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरंजली वाहीली.

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *