अखेर पोलिसी हेरगिरीच्या विरोधात राज्यपालांकडे लेखी तक्रार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी हेरगिरी केल्याच्या प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे लेखी तक्रार केल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

दोन दिवसापूर्वी अर्थात गुरूवारी विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे कर्मचारी अनधिकृतपणे माहिती घेत असल्याचे तसेच पत्रकारांची छायाचित्रे काढत असल्याचे दिसून आले होते. यासंदर्भात विखे-पाटील यांनी काल राज्यपालांना पत्र लिहून गृहखात्याविरूद्ध चौकशी व कारवाईचे निर्देश देण्याची मागणी केली.

आपल्या पत्रामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले आहे की, हा प्रकार अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. पोलिसांनी विधानसभा विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी विनाअनुमती प्रवेश करणे, पत्रकारांची छायाचित्रे काढणे, हा प्रकार अत्यंत संतापजनक, निषेधार्ह आणि घटनात्मक पद असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या मुलभूत हक्कांचा भंग करणारा आहे. या सरकारचा संविधानावर व लोकशाहीवर विश्वास आहे की नाही, असा गंभीर प्रश्न यातून उपस्थित होत असून ही बाब संविधान, लोकशाही, प्रजासत्ताक ही मूल्य नाकारण्यासारखीच आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना त्याच दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेत्याला अशा लोकशाहीविरोधी प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे दाद मागावी लागते, हे अत्यंत क्लेषदायक असल्याचेही विखे पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय? अहिल्यानगर जिल्ह्यातील दोघांना मारहाण करून लघवी पाजण्याचा विकृत प्रकार, गुन्हेगारांना मोक्का लावा; गोरक्षणाच्या नावाखाली चाललेला नंगानाच थांबवा.

महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता, याला मागील १२-१३ वर्षात काळिमा फासला आहे. आज महाराष्ट्र पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *