Breaking News

प्रकाश आंबेडकर यांची टीका, प्रशासनात लॅटरल एन्ट्री…आरक्षण धोक्यात धर्म नाही, तर आरक्षण धोक्यात

मी आधीही म्हणालो होतो, आज पुन्हा सांगतोय धर्म संकटात नाहीय, आरक्षण संकटात आहे. एससी, एसटी आणि ओबीसींना त्यांच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे हे भाजपाचे मॉडेल आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.

ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा-आरएसएस बाबासाहेबांचे कार्य टप्प्या-टप्प्याने पुसून टाकत आहेत. केंद्र सरकारमधील ४५ पदे मागच्या दाराने भरण्याऐवजी युपीएससी UPSC परीक्षेद्वारे भरली असती, तर ६ पदे एससी SC, ३ एसटी ST आणि १२ ओबीसी OBC प्रवर्गासाठी राखीव राहिली असती. आरक्षण धोक्यात आहे. हे आधीपासून कार्यरत असलेल्या एससी, एसटी आणि ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले जाईल कारण, उच्च पदे आता मागच्या दाराने (लॅटरल इन्ट्री) भरली जातील असा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, २४ सप्टेंबर १९६८ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात हे स्पष्ट केले होते की, नोकरशाहीतील कोणत्याही नियुक्तीसाठी आरक्षण दिले पाहिजे. वंचित बहुजन आघाडी या बाबासाहेबविरोधी, संविधान विरोधी, आरक्षण विरोधी, एससी-एसटी-ओबीसी SC-ST- OBC विरोधी आहे असे म्हणत भाजपा- आरएसएस RSS सरकारच्या लॅटरल इन्ट्रीच्या धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला.

शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने २० ऑगस्ट रोजी नागपुरातील बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे बैठक आयोजित केली असल्याचेही यावेळी जाहिर केले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *