राहुल गांधी म्हणाले, बॉण्ड प्रकरणी न्यायालयाचा निर्णय म्हणजे मोदींच्या भ्रष्ट धोरणाचा पुरावा

इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने इलेक्टोरल बॉण्ड जारी करणे परस्पर कायद्याचे उल्लंघन होत असल्याने बॉण्ड योजनाच बेकादेशीर ठरविण्याचा निकाल दिला. त्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे मोदीच्या भ्रष्ट धोरणांचा उघड पुरावा असल्याची टीका केली.

राहुल गांधी यांनी मागील काही काळापासून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आपल्या मित्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने सर्व योजना आणि उद्योग निती आखण्यात येत आहे. तसेच अनेक योजनांमध्ये मोदींच्या मित्रालाच फायदे मिळत असल्याचा सातत्याने आरोप करण्यात आला. त्याधर्तीवर सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्ड संदर्भात दिलेला निकाल हा उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.

दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही इलेक्टोरल बॉण्ड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत म्हणाले की, इलेक्टोरल बॉण्ड योजना बेकायदेशीर ठरवित पैशाच्या बदल्यात मत आणि पैशाच्या बदल्यात मत अशा स्वरूपाचे नवी धारणा रूजवू पहात होते. परंतु न्यायालयाच्या निकालामुळे अशा चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थांबवतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.

तर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या भ्रष्ट धोरणांच्या विरोधात काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी संसदेत आणि संसदेच्या बाहेर सातत्याने लढत आहोत. त्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे असेही सांगितले.

About Editor

Check Also

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर रुग्णाची केली विचारपूस

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *