राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, भाजपासाठी काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता… ज्याच्या मनात काँग्रेस त्यालाच पक्षात नेतृत्वाची संधी

देशात इंग्रज होते ते भारतीयांच्या स्वातंत्र्यांवर नियंत्रण ठेवत होते. पण त्यावेळी काँग्रेस नेतृत्वाच्या शोधात होते. पण ते नेतृत्व आले दक्षिण आफ्रिकेतून याचा अर्थ असा नव्हे की, दक्षिण आफ्रिकेने काँग्रेसला नेतृत्व दिले. मात्र हे नेतृत्व दिले गुजरातने महात्मा गांधी यांच्या रुपाने, त्यांच्यानंतर दुसरे नेतृत्व मिळाले ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या रूपाने. गुजरातमधील जनता पर्यायाच्या शोधात आहे. पण आपण त्यांना पर्याय देण्यात कमी पडत आहोत. त्यामुळे गुजरातला नव्या दमााचे नेतृत्व द्यायचे असेल तर जे भाजपासाठी काम करत आहेत, अशांना काँग्रेसमधून बाहेरचा रस्ता दाखवावा लागणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इशारा दिला.

गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

राहुल गांधी पुढे बोलताना मध्यंतरी मध्य प्रदेशातील एक शिष्टमंडळ मला भेटायला आले होते. त्यांच्याशी संवाद साधताना एका कार्यकर्त्याने मला सांगितले की, घोडे हे दोन पद्धतीचे असतात. त्यातील एक घोडा असतो तो लग्नाच्या वरातीसाठी आणि दुसरा घोडा असतो तो रेससाठी पण काँग्रेस काय करतेय की लग्नाच्या घोड्याला रेसमध्ये पाठवलं जातयं, मग रेस कशी जिंकणार. त्या पद्धतीने गुजरातच्या काँग्रेस पक्षातही दोन पद्धतीचे लोक आहेत. एक जो जनतेमध्ये मिसळतो, लोकांशी जोडलेला असतो, त्याच्या मनात काँग्रेसची विचार धारा आहे आणि त्या विचारधारेशी एकनिष्ठ रहात पक्षाचं काम करतो. तर दुसरा जो आहे तो जनतेसोबत नसतो, त्यांच्यात मिसळत नाही, लोकांपासून वेगळा राहतो, तो काँग्रेस पक्षात असला तरी तो काम करतो ते भाजपाचे. त्यामुळे आपल्याला अशा भाजपासाठी काम करणाऱ्या १०-२०, ३०-४० जणांना भलेही बाहेर काढवे लागले तरी त्यांना बाहेर काढू आणि ज्याच्या मनात काँग्रेसची विचारधारा आहे, काँग्रेससाठीच काम करतो त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मागील १५-२० वर्षापासून काँग्रेसला गुजरातमध्ये ४० टक्के मते मिळत आहेत. तसेच चर्चा असते ती फक्त निवडणूकांचीच पण आपण गुजरातच्या जनतेशी जोडले जात नाहीत, त्यांच्यात मिसळत नाही, तसेच आपण अशा लोकांना उभे करतो, त्यातील एक भाजपाचा असतो तर एक जण आपल्या विचारांचा, मग आपल्याला गुजरातच्या जनतेकडे सत्ता मागण्याचा कोणताच अधिकार रहात नाही असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मला इथल्या सर्वसामान्य जनतेशी, व्यापाऱ्यांशी, मध्यम व्यापाऱ्यांशी आणि तरूणांशी जोडालं जायचं आहे. त्यामुळे या सर्वांशी जोडले जाण्याचे काम आपण सर्वांना करायचे आहे. तेलंगणात आम्ही १०-१२ वर्षात तेथील मतांच्या टक्केवारीत २२ टक्क्यांची वाढ केली. पण गुजरातमध्ये ४० मते मिळत असूनही फक्त पाच टक्के मतांची वाढ आपल्याला करायची आहे, पण तेही आपल्याकडून होत नाही. हे जोपर्यंत होत नाही तो पर्यंत सत्ता मिळणार नाही. त्यामुळे पुढील पाच ते १० वर्षे फक्त यासाठी काम करावे लागणार असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *