राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, हिंदी नाही हे नक्की, ५ जुलैच्या विजयी मेळाव्याचा तपशील लवकरच तमाम मराठी जणांचे अभिनंदन, मेळाव्यात कोणाचा झेंडा नसेल

राज्य सरकारने पहिलीपासून तीन भाषा शिकवण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सक्ती करण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत राज्य सरकारच्या विरोधात ५ जुलै रोजी जाहिर मोर्चा काढण्याची घोषणा केली. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आणि पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला हा मुद्दा भलताच भारी पडू शकतो याचा अंदाज घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा केली.

या घोषणेसंदर्भात शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल राज्य सरकारच्या घोषणेचे स्वागत करत इशारा दिला. त्यानंतर आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. आज पुन्हा उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला. तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्व मराठी जनांचे अभिनंदन करत हिंदी भाषा शिकवली जाणार हे नक्की असे सांगत ५ जुलै रोजी विजयी मेळाव्यात कोणत्याही पक्षाचे झेंडे राहणार नाहीत असे सांगत विजयी मेळाव्याचे तपशील लवकरच कळविणार असल्याचे सांगितले.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. काल २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात विधान भवनावर मोर्चा २७ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 'बदर समिती'चा अहवाल रद्द करण्याची मागणी

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *