रोहिणी खडसे यांचा टोला, भाजपाच्या आमदाराला बॅलेट पेपरवर निम्मि मतंही मिळाली नाहीत चार महिन्यापूर्वी जिंकलेल्या आमदाराची अवस्था

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्टवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला भरघोस यश मिळाले. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांवर विजय मिळवला आहे.तर भाजपाच्या दोन्ही पॅलेनचा पराभव झाला असून चार महिन्यापुर्वी विजयी झालेल्या भाजप आमदाराला बॅलेट पेपरवर निम्मी सुद्धा मतं मिळाली नाहीत असा टोला राष्टवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.

सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपा नेत्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजपावर निशाणा साधत एक ट्विट केले. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, ४ महिन्यांपूर्वी ५० हजार मताधिक्याने जिंकलेला भाजपाचा एक आमदार, बॅलेट पेपर वर घेतलेल्या ‘सहयाद्री कारखाना’ निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही. पैशाचा वारेमाप वाटप करुन देखील पराभव झाला,असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड, कोरेगाव, सातारा, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यात आहे. कारखान्याच्या एकूण ३२ हजार २०५ सभासदांपैकी २६०८१ सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सत्ताधारी पी डी पाटील पॅनलला तब्बल १५ हजाराहून अधिक मते मिळाली. तर भाजपा आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलला ७ ते ८ हजारा दरम्यान मते मिळाली. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे निवास थोरात यांच्या तिसऱ्या पॅनेलला २२०० ते २३००  मते मिळाली. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्त्वातील पी.डी. पाटील पॅनेलचे सर्व उमेदवार ७५०० ते ८००० हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. या विजयानंतर कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता.

विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. यंदा निवडणुकीत भाजप आमदार मनोज घोरपडे, भाजप जिलाध्यक्ष धैर्यशील कदम आणि बाळासाहेब पाटील या तीन नेत्यांमधे तिरंगी लढत पार पडली होती. २५ वर्षानंतर झालेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत भरघोस यश प्राप्त केल्यानंतर बाळासाहेब पाटील यांना शरद पवार आणि जयंत पाटील यांचा फोन आला होता. शरद पवार यांच्याकडून बाळासाहेब पाटील यांचे कारखान्याच्या निवडणुकीत संपूर्ण पॅनेल निवडून आणल्या निमित्त विशेष कौतुक केले.

कारखान्यातील निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्ताधारी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने ४ हजार मतांची आघाडी घेतली होती. अनेक तास मतमोजणी सुरु होती. पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी गटाचा विजय निश्चित झाला असून सत्ताधारी गटाकडून जल्लोष सुरू झाला होता. भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. पहिल्या फेरीत सर्वच्या सर्व २१ जागांवर सत्ताधारी गट ४ हजाराहून अधिक मतांनी पुढे होता. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली होती. सह्याद्री साखर कारखान्यावर बाळासाहेब पाटलांचा झेंडा, पी.डी. पाटील पॅनलचा २१ – ० असा दणदणीत विजय, भाजप नेत्यांच्या दोन्ही पॅनलचा पराभव झाला.बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर काय निकाल लागू शकतो हे या निवडणूकीत दिसून आले.

About Editor

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *