संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय एकांगी त्यांनी…

शनिवारी प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरात काँग्रेसचे लोकसभा उमेदवार शाहु महाराज यांना बिनशर्त पाठिंबा जाहिर केला. तसेच शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरील युतीबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करताना म्हणाले की, शिवसेना उबाठा गटाबरोबरील युती आता राहिलेली नाही असे जाहिर करत आता जमलं तर महाविकास आघाडीसोबत युती नाही तर नाही असे यावेळी जाहिर केले.

त्यावर आज संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी युती तोडण्याबाबतचा निर्णय जाहिर करण्यापूर्वी एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करायला हवी होती अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने चर्चा झालेली होती. तरीही त्यांनी ही युती तोडत असल्याचे केले. वास्तविक पाहता प्रकाश आंबेडकर यांनी युती तोडण्याचा जाहिर केलेली घोषणा ही एकतर्फी असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाला आम्ही चार जागा देऊ केल्या होत्या. तसेच त्यांनी अधिकच्या जागा मागितल्या होत्या, असेही यावेळी सांगितले.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी साधारणतः वर्षभरापूर्वी निर्णय घेतला. ही युती स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूकासाठी करण्यात आली होती. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केलेल्या निर्णयाबाबत पुर्नविचार करावा असे आवाहनही यावेळी केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *