अंदमानातील तुरूंगवासानंतरचे वीर सावरकर, चार खंडातील पुस्तकांचे लवकरच प्रकाशन हिंदी भाषेत प्रकाशित होणार असल्याची बीमा मंडीचे संस्थापक प्रशांत करूलकर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
स्वातंत्र्यावीर वि.दा.सावरकर यांच्या अंदमान येथील तुरुगांनंतरच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या हिंदी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार असून या पुस्तकाचे चार खंड प्रकाशित होणार आहेत. रत्नागिरी पर्व, हिंदू महासभा पर्व, अखंड हिंदूस्थान संघर्ष पर्व आणि अंतिम पर्व अशा चार खंडातील हिंदी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन सावरकरांच्या १३७ व्या जयंतीदिनी होणार असल्याची माहिती बीमा मंडीचे संस्थापकीय संचालक प्रशांत करूलकर यांनी दिली.
सावरकर यांच्यावरील स्वातंत्र्यावीर सावरकर या आत्मचरित्र पुस्तकाचे यापूर्वी मराठीत सावरकर प्रतिष्ठानच्यावतीने मराठीत पुस्तक प्रकाशित झाले आहे. आता ते देशातील इतर प्रादेशिक भाषेत पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा विचार भीमा मंडीचा असल्ाचे त्यांनी सांगितले.
या चारही खंडात लिहिण्यात आलेल्या पुस्तकाचे लेखन स्वा.सावरकर यांचे सचिव यांनी लिहीलेले आहे. सावरकरांचे विचार संपूर्ण देशभरात आणि जगात प्रसारीत करण्यासाची योजना असून या कार्यक्रमांचा ८० टक्के भाग तयार करण्यात आलेला आहे. आगामी दिवाळीला यासंदर्भात एक मोठा कार्यक्रम करून त्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *