शिवसेनेच्या बंडखोरांविरोधात बाप सर्वोच्च न्यायालयात तर पोरगं म्हणतं हिच खरी सेना ईडी कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा

महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकण्यासाठी ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ज्या १६ आमदारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेची याचिका दाखल करणारे शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी आज जाहिररित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बाप ज्या बंडखोरांच्या विरोधात याचिका दाखल करतोय त्यांच्याच कळपात पुत्राने प्रवेश केल्याने ठाकरे गटाच्या अस्तित्वाबाबत नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. बाळासाहेब आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून तिसरा शब्द माझ्यासमोर आलेला मला आठवत नाही. हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेलं स्वप्न हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. ते वाढवत आहेत. यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही आधीपासून एकमेकांबरोबर काम केलं आहे. मी एकनाथ शिंदे यांना जवळून काम करताना बघितलं आहे. त्यांच्या कामाचा वेग आणि त्यांची निर्णयक्षमता पाहून मी त्यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला.

माझं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे काही सामाजिक कार्य आहे, ते मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून करत होतो. पण आता एकनाथ शिंदे यांच्या नवीन सरकारचं काम बघून आणि त्यापासून प्रेरित होऊन मी यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया भूषण देसाई यांनी दिली.

दरम्यान, ८ वर्षे उद्योग खात्याचा कारभार सांभाळणारे सुभाष देसाई यांच्या उद्योग विभागात देसाई यांच्या बंगल्यावर रहात असलेल्या एका व्यक्तीकडून सातत्याने हस्तक्षेप करण्यात येत असल्याची चर्चा त्यावेळी चांगलीच रंगली होती. तसेच सुरुवातीला उद्योग विभागात दलाल म्हणून आलेल्या व्यक्तीच्या कंपनीत देसाईंच्या शासकिय बंगल्यावर रहात असलेल्या व्यक्तीने थेट भागीदारी केली. त्यानंतर या कंपनीचा मुळ मालक आणि तो रहात असलेला व्यक्ती थेट अधिकाऱ्यांना फोन करून आदेश देत असत. याविषयीचा मुद्दा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनीही विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर उद्योग विभागाच्या कामात थेट हस्तक्षेप करणाऱ्या कंपनीच्या संबधित व्यक्तींवर ईडीने धाडी टाकत अनेक कागदपत्रे ताब्यात घेतल्याचीही चर्चा त्यावेळी सुरु होती. त्यामुळे भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा उद्योग विभागाच्या जून्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची मागणी, कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करा आणि नुकसान भरपाई द्या प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्या, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *