संजय राऊतांच्या विनंतीला मान देत विधानसभेने दिली मुदतवाढ, पण तारीख नाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सभागृहात मुदतवाढीची घोषणा

राज्याच्या विधिमंडळाला ’चोरमंडळ’ असे संबोधल्याप्रकरणी हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आलेले शिवसेना (ठाकरे गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्र पाठवित सविस्तर खुलासा देण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यावर सविस्तर खुलासा सादर करण्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुदतवाढ देण्यास मान्यता दिली. मुदतवाढीनुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सप्ष्ट केले. मात्र, ही मुदतवाढ किती दिवसांची असेल याबाबत त्यांनी उल्लेख केलेला नाही.

खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संतप्त पडसाद उमटले होते. सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणीही केली. याबाबत दाखल झालेल्या हक्कभंगाबाबत निर्णय करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग समिती स्थापन केली आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून राऊत यांना यासंदर्भात लेखी खुलासा करण्याची सूचना १ मार्च रोजी नोटीसीद्वारे केली होती. मात्र, राऊत यांनी आज, बुधवारी आपणास लेखी खुलासा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार राऊत यांना खुलासा सादर करण्यासाठी मुदतवाढ दिल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

यासंदर्भात बोलताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, हक्कभंगाबाबत दोन दिवसात चौकशी करून यासंदर्भात ८ मार्च २०२३ रोजी मी याबाबत सभागृहाला अवगत करीन असे सांगितले होते. संसदीय कार्यपद्धतीनुसार याप्रकरणी प्रथमदर्शनी विशेष अधिकारभंग होतो किंवा कसे हे पाहून त्याअनुषंगाने जाहीर केल्यानुसार नैसर्गिक न्याय तत्वानुसार संजय राऊत यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना १ मार्च रोजीच्या पत्रान्वये त्यांचा लेखी खुलासा जाणून घेण्यासाठी सायंकाळी ६.३० पर्यंत वेळ देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ८ मार्च रोजी पत्रान्वये याप्रकरणी सविस्तर खुलासा सादर करण्याबाबत मुदतवाढ देण्यास विनंती केली आहे. त्यांनी केलेली विनंती मान्य करून त्यांना याप्रकरणी सविस्तर खुलासा करण्यासाठी मुदत वाढवून देत असून त्यानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.

संजय राऊत यांनी विधानसभाध्यक्षांना पाठविलेले हेच ते पत्र-

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानांसह रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा करा नीट प्रकरणी संसदेत चर्चा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करणे व पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार

नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *