अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची चर्चा कधी झालीच नव्हती शिवसेनेची भाजपाऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा सुरु असल्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील निवडणूकांचे निकाल जाहीर होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेत सरकार स्थापनेसाठी सर्व मार्ग खुले असल्याचे जाहीर केले. त्याचा सर्वात मोठा धक्का आम्हाला बसला. त्यांना अनेकवेळा मी स्वतः फोन केला. पण त्यांनी तो स्विकारला नाही. तसेच अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत माझ्यासमोर चर्चा झालीच नाही. तसेच अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासमोरही झाली नाही किंवा त्यांच्यापैकी कोणीही शब्द दिला नसल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्यपाल कोश्यारी यांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ते पहिल्यांदाच बोलत होते.
उध्वव ठाकरे यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेवून सरकार बनविण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचे सांगितल्याने आमच्यासाठी तो धक्का होता. महायुती असताना आमचे सर्व पर्याय खुले आहेत असे का म्हणाले असा प्रश्न निर्माण झाला. तरीही माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेत मी म्हणालो की महायुतीचेच सरकार स्थापन होणार असल्याचे जाहीर केले होते असे त्यांनी सांगितले.
गेली १५ दिवस जी काही वक्तव्य महाराष्ट्रात पाह्यला मिळाली.
तुम्हाला खोटे किंवा चुकीचे सांगण्यासाठी हे सांगत नाही. जे काही गैरसमज झाले असतील ते चर्चेतून सोडवू शकलो असतो. मात्र चर्चा करायची नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मागील पाच वर्षात अनेकवेळा त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढला. पण यावेळी उध्दवजींना अनेकवेळा फोन केला. पण त्यांनी घेतला नाही. त्यामुळे चर्चा शिवसेनेने थांबविल्याचा आरोप करत आमच्याबरोबर चर्चा न करता काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करायला वेळ मिळत होता. त्यांच्याशी शिवसेनेकडून दिवसातून ३-३वेळा चर्चा करण्यात येत होत्या असे ते म्हणाले.
महायुती म्हणून निवडणूकीसाठी सामोरे गेलो असताना शिवसेनेने स्विकारलेले धोरण योग्य नाही. शिवसेनेने आमच्यावर आणि पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका सातत्याने केली असली तरी शिवसेनेवर आम्ही कोणतीही टीका करणार नाही. टीका केल्याने प्रसारमाध्यमात जागा मिळेल मात्र त्याने प्रश्न सुटणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *