राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात सरासरी ५४.३३ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराला निर्धारीत वेळेपेक्षा जास्तीचा वेळ घेण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर संध्याकाळी लांबच लांबच रांगा लागल्याचे दिसून येत होते

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

धुळे- ५६.६१ टक्के

दिंडोरी- ६२.६६ टक्के

नाशिक – ५७.१० टक्के

पालघर- ६१.६५ टक्के

भिवंडी- ५६.४१ टक्के

कल्याण – ४७.०८ टक्के

ठाणे – ४९.८१ टक्के

मुंबई उत्तर – ५५.२१ टक्के

मुंबई उत्तर मध्य – ५१.४२ टक्के

मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७ टक्के

मुंबई दक्षिण – ४७.७० टक्के

मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के

About Editor

Check Also

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

ग्रामपंचायत निवडणूक नियमावलीतील काही तरतुदी आणि आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून राबवली जाणारी पद्धत ही अनुसूचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *