उद्धव ठाकरे यांचा आरोप, मतांची चोरी ही लोकशाहीवरील दरोडा निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीच्या आधारे लोकसभा निवडणूकीत झालेल्या मतांच्या चोरीचा पदार्फाश केला. तसेच बोगस नावे आणि दुबार नावांच्या आधारे अप्रत्यक्षरित्या निवडणूक आयोगाने कशा प्रकारे मदत केली. त्यावरही प्रकाशझोत टाकला. त्यानंतर इंडिया आघाडीच्यावतीने दिल्लीसह देशमभरात आंदोलन करण्यात आले. त्यानुसार शिवसेना उबाठाकडून मुंबईसह महाराष्ट्रात निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या मत चोरीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतांची चोरी ही लोकशाहीवरील दरोडा असल्याचा आरोप केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर केला.

एका बाजूला देशाची राजधानी दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात संसदेचे खासदारांचे आंदोलन आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ठाकरे शिवसेनेचे भ्रष्टाचारी मंत्र्यांना हटविण्या विरोधातील आंदोलन या दोन्ही प्रकरणामुळे राजकारण पुर्णता ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमिवर बोलताना भ्रष्टाचारी मंत्र्याचे राजीनामे मागणी करत राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयापेक्षा पेक्षा मोठे आहे का, असा संतप्त सवाल हल्लाबोल केला.

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर ठाकरे शिवसेना रस्तावर उतरत आक्रमक आंदोलन केले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशीं यांच्या कार्यकाळात पाच मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याची आठवण करून दिली. शोभाताई फडणवीस, घोलप, सुतार आणि रवींद्र माने यांच्यावर आरोप झाले आणि त्यांचे राजीनामे घेतले. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, जनतेचा रोष आहे, राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा, जर चौकशीत निर्दोष सुटलात तर मंत्रिमंडळात घेईन. हा होता कारभार. ते जनताभिमुख सरकार होते. आता जनताभिमुख सरकार नव्हे तर पैसे गिळणारे मुख आहे, असे यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटले. पण यावेळी त्यांनी सरकारमधील सर्व भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

सुरतला पळून जायला आणि गुवाहाटीला पळून जायला. डोकं कुठे आहे? नुसतं खोकं आहे डोकं नाहीच. डोक्याच्या ऐवजी खोके आहेत. त्याच्यामुळे ते फक्त खोके घेऊन बसले आहेत, असे टीकास्त्र ठाकरेंनी डागले. आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत. या जुलूमशाहीच्या विरोधात आता जनतेला रस्त्यावर उतरावेच लागेल, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, आपण दरवेळी सांगतो की, शिवाजी महाराजांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र. नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. असा गौरवशाली आपला महाराष्ट्र या आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवला आहे. बाकी भ्रष्टाचाराच्या रांगेत एक नंबरला आहेत. जर भ्रष्टाचाराची रांग लावली तर पहिल्या नंबरला. पण विकास आणि नितीमत्ता पाहिले तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत, असे खडेबोलही सत्ताधाऱ्यांना सुनावले.आजपर्यंत अशी परंपरा होती की कुठल्याही मंत्र्यावर आरोप झाले की त्याची जबाबदारी घेऊन त्या मंत्र्य़ांचा राजीनामा घेऊन त्यांना चौकशीला सामोरे जावे लागते. एका मंत्र्यावर महिलेचे आरोप होते, तो वनमंत्री असताना त्याला वनवासात पाठवले होते. अगदी केंद्रातही अशा घटना होत्या.

मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते अशी टीका करत उद्धव ठाकरेंनी म्हटले की, त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे, वरती दिल्लीमध्ये तुमचे बापजादे बसले आहेत, तरी तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचाऱ्यांना काढून टाकायची. फडणवीसांची अवस्था पाहा. आपण असे समजू की त्यांनी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही, मग का त्यांच्यासाठी तुम्ही बदनामी ओढवून घेत आहात. का तुम्ही त्यांच्यावर पांघरूण घेत आहात. जगातला सर्वात मोठा पक्ष भाजपा त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणसे नाहियेत. तसेच तुम्हाला भ्रष्ट मंत्री काढून त्यांच्याऐवजी दुसऱ्याला संधी द्यायला दुसरा माणूस नाहिये? कुणाचा दबाव आहे तुमच्यावरती? हा भ्रष्टाचार तुम्हाला पटतो का हे फडणवीसांनी जाहीर करावे. अन्यथा फडणवीसांनी सांगावे की हे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, दबाव आहे माझ्यावर. अरे मग दबाव झुगारून द्या, असे टीकास्त्रही सोडले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगा विरोधात लढाई सुरू असताना सरकार का मध्ये पडतंय? असा सवाल करत पुढे म्हणाले की, आपल्या विरोधातील मतांची छाटणी करायची आणि मतांची चोरी करून आपली मते वाढवायची. हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा काढलं. बॅलेटवर निवडणुका घ्या अशी  मागणी होती. व्हीव्हीपॅटवरच्या रिसीटची मोजणी कधीच झाली नाही, सिम्बॉलिक मोजणी झाली. आता व्हीव्हीपॅट काढलं, निवडणूक आयोग एक एक निर्णय मर्जीने घेत आहे. निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतीं पेक्षा मोठे झाले का? असा सवाल यावेळी केला.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारने केलेला तमाशा लांच्छनास्पद आहे. खासदारांना सांगितलं की निवडणूक आयोगाकडे नेतो पण त्यांना पोलीस स्टेशनला नेलं हे दरोड्याचं काम आहे. पंतप्रधान आणि इतरांनी समोरासमोर बसून राहुल गांधी यांनी सादरीकरण दिलं ते समजून घेतलं पाहिजे. देशभरात मुद्दा लावून धरला पाहिजे. देशाच्या लोकशाहीचा मुद्दा आहे, सहा महिन्यात ४५ लाख मते वाढली. ती आली कुठून? त्यामुळे तुम्ही नावं तपासून घ्या, आपल्या पत्त्यावर आणखी काही मतदार घुसवून लोकशाहीला काळीमा फासला आहे. असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी  लगावला. आयोगाच्या विरोधात लढाई आहे. पण यात भाजपा का पडत आहे याचा अर्थ मतांची चोरी आहे हे उघड झालं आहे. राहुल गांधी यांनी मतांची चोरी कशी झाली हे सप्रमाण दाखवून दिलं आहे. आयोग त्यांना प्रतिज्ञापत्र मागत आहे,  हा कोणता उफराटा कारभार आहे? असंही यावेळी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची फलश्रुती गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *