संतोष देशमुख हत्ये प्रकरणी विशेष वकील उज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती मस्साजोगवासिय आणि देशमुख कुटुंबियांच्या सात पैकी एक मागणी सरकारकडून मान्य

गेल्या काही महिन्यापासून राज्यात गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांस अटक करण्यात आली. तसेच या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे वगळता इतर पाच ते सात आरोपींनाही अटक करण्यात आली. परंतु या हत्या प्रकरणातील आरोपींना कायदेशीर शिक्षा व्हावी म्हणून मस्साजोगमधील रहिवाशी आणि देशमुख कुटुंबियांकडून विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची करण्यात यावी अशी मागणी करण्यता येत होती. त्यानुसार राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करत असल्याचे नोटीफिकेशन आज जारी केले.

भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी उज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता. मात्र उज्वल निकम यांना निवडणूकीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आपल्या मूळ व्यवसायाकडे उज्वल निकम हे वळणार का नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. तसेच उज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या कामाबाबत काहीजणांकडून आक्षेपही व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे यापुढे राज्यातील कोणत्याही महत्वाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती जाणार नाही अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्याविरोधात भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या सोबत पुढाकार घेत राज्यभरातील अनेक जिल्ह्यात जाहिर सभा घेत मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संबधावर प्रकाश टाकला. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणीही सुरेश धस यांनी केली.

त्यानुसार अखेर याप्रकरणी राज्य सरकारने आज उज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करत असल्याचे नोटीफिकेशन जारी केले. त्यामुळे बीड-केज येथील न्यायालयात यापुढे उज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांची बाजू मांडणार आहेत.

दरम्यान, उज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे देशमुख कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. मात्र कृष्णा आंधळे फरार प्रकरणी आणि पोलिसांनी केलेल्या चुकांच्या विरोधात देशमुख कुटुंबियांनी सुरु केलेले आंदोलन यापुढेही सुरु राहणार असल्याचेही यावेळी धनंजय देशमुख यांनी सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ जुलैपासून वाहनांना एचएसआरपी बसविणे अनिवार्य नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने १ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *