तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने वाद निर्माण केला आहे. यावेळी, लोकसंख्या नियंत्रणावर ते यू-टर्न घेतल्यासारखे दिसते.सोमवारी, नागापट्टिनम येथे द्रमुक जिल्हा सचिवाच्या लग्न समारंभात उपस्थित असताना, ७२ वर्षीय स्टॅलिन यांनी तरुण जोडप्यांना लग्नानंतर ‘तात्काळ’ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. कारण जास्त लोकसंख्या ही अधिक खासदार मिळविण्याचा निकष असल्याचे सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमांकन-डिलिमीटेशनचा प्रस्ताव मांडल्यानंतर आणि दक्षिणेकडील राज्यांच्या प्रतिनिधित्वावर त्याचा परिणाम होण्याच्या शक्यतेवरून सध्या वाद सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर एम के स्टॅलिन यांचे हे वक्तव्य आले.
द्रमुक अध्यक्ष एम के स्टॅलिन पुढे म्हटले की, काही वर्षांपूर्वी नवविवाहित जोडप्यांना लग्नानंतर लगेच मुले होऊ नयेत असा सल्ला देण्यात आला होता, परंतु आता तोच सल्ला पाळला जाऊ नये.
एम के स्टॅलिन पुढे म्हणाले की, कारण आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, जास्त लोकसंख्या असलेले लोकच अधिक खासदार मिळवू शकतील कारण सीमांकन प्रक्रिया लोकसंख्येच्या आधारावर असेल,” असे स्टॅलिन म्हणाले. तामिळनाडूने लोकसंख्या नियंत्रणाकडे लक्ष दिले आणि ते यशस्वी झाले आणि आज राज्याच्या दुर्दशेचे तेच कारण आहे, असे त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.
पुढे बोलताना एम के स्टॅलिन म्हणाले की, मी तुम्हाला घाईघाईने मुले होऊ नका, लगेच मुले होऊ नका असे सांगणार नाही; परंतु त्यांना सुंदर तमिळ नावे द्या, असेही थेट वधू-वरांना आवाहन केले.
स्टॅलिनची भीती कदाचित या कारणामुळे निर्माण झाली आहे की, लोकसंख्येच्या आधारावर येणाऱ्या सीमांकन प्रक्रियेमुळे उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेचे संसदेत प्रतिनिधित्व कमी होईल.
एम के स्टॅलिन म्हणाले की, राज्य अशी प्रक्रिया स्वीकारणार नाही जी दक्षिणेकडील राज्यांना अन्याय्यपणे नुकसान पोहोचवेल असे त्यांचे मत आहे. स्टॅलिन यांनी व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये आपली भूमिका पुन्हा सांगितली, आमची मागणी स्पष्ट आहे – केवळ लोकसंख्येच्या आधारावर संसदीय मतदारसंघ निश्चित करू नका. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार उपाययोजना करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांना शिक्षा करू नका असेही यावेळी आवाहन केले.
या पार्श्वभूमीवर, प्रस्तावित सीमांकन-डिलिमिटेशन प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी ५ मार्च रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ४० पक्षांपैकी बहुतेकांनी त्यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे, तर काहींनी नकार दिला आहे. या पक्षांना आवाहन करताना, मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजकीय दृष्टिकोनातून या मुद्द्याकडे पाहू नका असे आवाहन केले.
भाजपा आणि माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (मूपनार) हे बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतलेल्या प्रमुख पक्षांपैकी आहेत. “मी त्यांना आवाहन करू इच्छितो की, कृपया पुनर्विचार करा. हा द्रमुक आणि तुमच्या पक्षामधील मुद्दा नाही, स्टॅलिन म्हणाले. हे तामिळनाडू, त्याचे हित आणि त्याचे अधिकार यांच्याशी संबंधित आहे आणि म्हणूनच ज्या पक्षांनी भाग घेणार नाही असे जाहीर केले आहे त्यांनीही सहभागी व्हावे असे आवाहन केले.
Marathi e-Batmya