संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन, पाकिस्तानबाबत आयएमएफने पुनर्विचार करावा दहशतवादी नेटवर्क पुन्हा उभारण्याचे प्रयत्न सुरु

पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने उद्ध्वस्त केलेले दहशतवादी नेटवर्क पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत आहे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आयएमएफ IMF ला पाकिस्तानला दिलेल्या नवीनतम मदत पॅकेजचा पुनर्विचार करण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

भुज एअरबेसवर राजनाथ सिंह ऑपरेशन सिंदूरसाठी काम केलेल्या “हवाई योद्ध्यांचे” कौतुक केले, तसेच पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, आयएमएफ IMF कर्जाचा एक महत्त्वपूर्ण भाग “निश्चितपणे” दहशतवादी पायाभूत सुविधांना निधी देण्यासाठी वापरला जाईल अशी शक्यता व्यक्त केली.

दोन्ही देशांमधील युद्धादरम्यान पाकिस्तानने लक्ष्य केलेल्या लष्करी ठिकाणांपैकी भुज हा एक हवाई दल तळ होता.

राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तान सरकारने मुरीदके आणि बहावलपूर येथे असलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या दहशतवादी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. आयएमएफकडून येणाऱ्या एक अब्ज डॉलर्सचा एक मोठा भाग निश्चितच या दहशतवादी पायाभूत सुविधांसाठी वापरला जाईल. आयएमएफकडून हे अप्रत्यक्ष निधी मानले जाणार नाही का? असा सवालही यावेळी केला.

९ मे रोजी, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध तणाव परिस्थिती शिखरावर असताना, आयएमएफने भारताच्या आक्षेपांना न जुमानता त्यांच्या विस्तारित निधी सुविधा (ईएफएफ) कर्ज कार्यक्रमाचा भाग म्हणून इस्लामाबादसाठी १ अब्ज डॉलर्सचा हप्ता मंजूर केला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत ही दहशतवादाच्या वित्तपुरवठ्यापेक्षा कमी काही नाही.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दहशतवादी असला तरी  त्यांचे सरकार मसूद अझहरवर खर्च करण्याची योजना आखत असल्याचा आरोप केला.

पाकिस्तानचे मंत्री राणा तन्वीर हुसेन यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने उद्ध्वस्त केलेल्या नऊ दहशतवादी तळांपैकी एक असलेल्या मुरीदकेला भेट दिल्यानंतर एक दिवस आधी सिंह यांनी हे विधान केले आणि सरकार स्वखर्चाने या भागाची पुनर्बांधणी करेल असे सांगितले.

मुरीदके हे लष्कर-ए-तोयबाचे केंद्र आहे, तर बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आहे. पहलगाम हल्ला, ज्यामध्ये २६ लोक मारले गेले होते, तो लष्कर-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला होता.

अण्वस्त्रांबाबत पाकिस्तानच्या बेजबाबदार वृत्तीकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना, संरक्षणमंत्र्यांनी भारतीय कवी बशीर बद्र यांचे उदाहरण दिले. राजनाथ सिंह म्हणाले की, भविष्यात पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवादी घटकांच्या हाती लागणार नाहीत याची कोणतीही हमी नाही.

यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, कपडे कागदाचे बनलेले आहेत, ते दिव्यांचे शहर आहे – काळजीपूर्वक चाला, कारण तुम्ही नशेत आहात, असा इशाराही शायर बद्र यांच्या शब्दातून दिले.

About Editor

Check Also

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या ढिसाळ आयोजनाबद्दल अश्विनी वैष्णव यांनी मागितली माफी कार्यक्रमाला हजर राहणाऱ्यांची संख्या वाढल्याने अव्यवस्था

जगातील सर्वात मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्ता मेळाव्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *