मल्लिकार्जून खर्गे यांची पंतप्रधान मोदींवर टीका, ४४ परदेशी दौरे, पण मणिपूरला एक सेंकदही नाही राजधर्म राखण्यात पंतप्रधान मोदी अपयशी

पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पहलगाम येथे हल्ला करून २७ भारतीय पर्यटकांचा बळी घेतला. त्यावरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून परदेश दौरे आणि निवडणूकांच्या रॅली करण्यात येत आहेत. तसेच पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या घोषणाही करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करताना आतापर्यंत ४४ परदेशी दौरे केले पण एक सेंकदही मणिपूरला भेट न देऊन ‘राजधर्म’ पाळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.

एक्स X वरील एका पोस्टमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, मागील दोन वर्षापासून मणिपूर अशांत आहे, पण पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरच्या भूमीवर साधे पाऊलही ठेवले नाही.

पुढे आपल्या ट्विट मध्ये मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचार ३ मे २०२३ रोजी सुरू झाला आणि अजूनही सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच तामेंगलाँग जिल्ह्यात झालेल्या हिंसक संघर्षात २५ लोक जखमी झाले होते, अशी आठवणही यावेळी मोदी यांना करून दिली.
मल्लिकार्जून खर्गे यांनी सांगितले की, २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ६८,००० लोक विस्थापित झाले आहेत आणि हजारो लोक अजूनही मदत छावण्यांमध्ये राहत आहेत.

ट्विटमध्ये मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, नरेंद्र मोदीजी, मणिपूर तुमच्या उपस्थितीची आणि शांतता आणि सामान्यता परतण्याची वाट पाहत असताना, आम्ही तुम्हाला ३ प्रश्न विचारू इच्छितो. जानेवारी २०२२ पासून, मणिपूरमधील तुमच्या शेवटच्या निवडणूक रॅलीपासून, तुम्ही जगभरात ४४ परदेश दौरे केले आहेत आणि देशभरात २५० देशांतर्गत दौरे केले आहेत, तरीही तुम्ही मणिपूरमध्ये एक सेकंदही घालवलेला नाही. मणिपूरच्या लोकांबद्दल ही उदासीनता आणि तिरस्कार का? राजकीय जबाबदारी कुठे आहे,” असा सवालही यावेळी केला.

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, राज्यातील लोकांनी मागणी करूनही राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली नाही. भाजपाला काँग्रेस पक्षाने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला आणि भाजपाचे स्वतःचे आमदार मुख्यमंत्री निवडू शकले नाहीत तेव्हाच २० महिन्यांनंतरच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी मान्य करण्यात आली.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, डबल इंजिन सरकार आपल्या नागरिकांना सुरक्षा आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या घटनात्मक कर्तव्यात का अपयशी ठरले? तुम्ही मुख्यमंत्र्यांना आधीच का काढून टाकले नाही? असा सवालही यावेळी करत तुमचे डबल इंजिन सरकार अजूनही मणिपूरला अपयशी ठरत आहे. गृहमंत्रालयाचे शासन लागू असूनही, हिंसाचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत, असा आरोपही यावेळी केला.

केंद्राने आपली “अक्षमता” लपविण्यासाठी “मध्यरात्री २ वाजता” घाईघाईने राष्ट्रपती राजवटीचा ठराव मंजूर केल्याचा आरोपही मल्लिकार्जून खर्गे यांनी केला.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांच्या वांशिक संघर्षात मणिपूरच्या अर्थव्यवस्थेचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. केंद्राने संसदेत आणलेल्या राज्यासाठी अनुदानाच्या मागणीमुळे अनेक सामाजिक खर्चात कपात झाली. गृहमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शांतता समितीचे काय झाले? तुम्ही सर्व समुदायांच्या, अगदी दिल्लीतील, प्रभावित लोकांना का भेटले नाही? तुम्ही राज्यासाठी विशेष पॅकेज का जाहीर केले नाही? असा प्रश्नांचा भडिमार करत मोदीजी, पुन्हा एकदा, तुम्ही ‘राजधर्म’ पाळण्यात अपयशी ठरलात अशी खोचक टीकाही केली.

About Editor

Check Also

हवाला व्यवहार करणारे जम्मू आणि काश्मीरमध्ये ८ हजार मुल अकाऊंट्सचा शोध ८ हजार बँक खात्यांचा सुरक्षा यंत्रणांकडून शोधली

सुरक्षा संस्थांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये तथाकथित “मुल अकाउंट्स” चे वेगाने वाढणारे नेटवर्क उघड केले आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *