लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा देशातील जनतेने भाजपाला मतदान करत पुन्हा केंद्रातील सत्तेत विराजमान केले. मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सबका साथ सबका विकासचा नारा दिला खरा मात्र या सरकारने एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप काढून घेतल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना टॅग करत त्याची आकडेवारीच जाहिर केली.
तसेच विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपच्या निधीतही दरवर्षी २५ टक्के कपात करण्यात येत असलयाचेही यावेळी आरोप एक्सवरून केला.
मागील १० वर्षात एससी, एसटी, ओबीसीच्या किती विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात आली आणि त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला त्याची आकडेवारीही काँग्रेसने यावेळी दिली.
मल्लिकार्जून खर्गे पुढे आपल्या एक्सवरील प्रोफाईलवर म्हणाले की, जोपर्यंत देशातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना संधी मिळत नाहीत आणि त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन मिळत नाही, तोपर्यंत आपण आपल्या देशातील तरुणांसाठी नोकऱ्या कशा निर्माण करू शकू? “सबका साथ, सबका विकास” ही तुमची घोषणा दररोज दुर्बल घटकांच्या आकांक्षांची थट्टा करते असा खोचक टोलाही पंतप्रधान मोदी यांना लगावला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या स्कॉलरशिपची आकडेवारीही यावेळी दिली.
आकडेवारीनुसार एससीच्या प्री मॅट्रीक विद्यार्थ्यांना ९ वर्षात ५७ टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात आली.
ओबीसीच्या प्री मॅट्रीक विद्यार्थ्यांना ५ वर्षात ७७ टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्री मॅट्रीक स्कॉलरशिप ४ वर्षात ९४ टक्के विद्यार्थ्यांना
एससी-पोस्ट मॅट्रीक विद्यार्थी ९ वर्षात फक्त १३ टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
एसटी पोस्ट मॅट्रीक विद्यार्थ्यांना १० वर्षात २१ टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
ओबीसी ईबीसी आणि डिएनटीच्या विद्यार्थी १० वर्षात ५८ टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रीकच्या विद्यार्थ्यांना ४ वर्षात ८३ टक्के स्कॉलरशिप
मोफत कोचिंग क्लास योजना एसी आणि ओबीसी विद्यार्थी पाच वर्षात ८३ टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
राष्ट्रीय फेलोशिप ९ वर्षात ५३ टक्के एससी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना चार वर्षात ५१ टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
प्री मॅट्रीक छात्रवृत्ती एसटी ९ वर्षात फक्त ३ टक्क्यांची वाढ
.@narendramodi जी,
देश के SC, ST, OBC और Minority वर्ग के युवाओं की छात्रवृत्तियों को आपकी सरकार ने हथियाने का काम किया है।
ये शर्मनाक सरकारी आँकड़े बताते हैं कि सभी वज़ीफों में मोदी सरकार ने लाभार्थियों की भारी कटौती तो की है, साथ ही औसतम साल-दर-साल 25% फंड भी कम ख़र्च किया… pic.twitter.com/JG7cDkkbs8
— Mallikarjun Kharge (@kharge) February 25, 2025
Marathi e-Batmya