विशेष बातमी

डाव्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्वतंत्र अजेंडा आझाद मैदानावर दोन्ही पक्षांचे मर्यादीत कार्यकर्त्ये हजर

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांच्या जवळपास सर्वच संघटनांनी एकत्रित येत मोर्चा काढला. या मोर्चात आदिवासी, कातकरी आणि शेतमजूरांचा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. मात्र या मोर्चाचे सारे श्रेय मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचे फारसे कार्यकर्त्ये न आणता श्रेय लाटल्याचे चित्र आजच्या सर्वच घटनांवरून दिसून येत …

Read More »

मेट्रोसाठी लागणाऱ्या मिठागरांच्या जमिनींची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली भाजपा खासदारावर भाजपा खासदार गिरीष बापट यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने उपस्थित करण्यात येत असलेल्या आरे मेट्रो कारशेड आणि कांजूर मार्ग जमिनीवरून चांगलेच रणकंदन माजले असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या भविष्यातील मीठागरांच्या जमिनी मेट्रोसाठी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी भाजपाचे खासदार गिरीष बापट यांच्यावर सोपविल्याची …

Read More »

या वर्गातील प्रवाशांना मिळणार रेल्वे तिकिटात सवलत सवलतींची नवी यादी रेल्वेविभागाकडून जाहिर

मुंबईः विशेष प्रतिनिधी देशभरात विविध कारणासाठी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरीक असलेल्यांना रेल्वेने प्रवास करावा लागतो. मात्र प्रवास करणाऱ्या दिव्यांग, वरिष्ठ नागरीक, रूग्ण आदींना यापूर्वी रेल्वे तिकिटात सवलत मिळत होती. मात्र आता इंटरव्हिव्युसाठी जाणाऱ्या बेरोजगारांनाही तिकिट किंमतीत सवलत देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून त्याविषयीची यादीही जाहिर करण्यात आली. तिकिट सवलत मिळणाऱ्यांची …

Read More »

आता आमदार किंवा ओळख नसली तरी विधानमंडळ बघता येणार जनता आणि पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पर्यटनवृध्दीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला. यासंदर्भात विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटन मंत्री ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. …

Read More »

औरंगाबाद नामांतर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले शिवसेनेला ढोंगी म्हणे शिळ्या कढीला ऊत आणला जातोय

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावरून धुराळा उठत असतानाच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी नामांतरचा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्याच्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या या भूमिकेला चक्क ढोंगीपणाची उपमा देत शिळ्या कढीला ऊत आणण्याचा …

Read More »

पाच तासाच्या बैठकीनंतर मुंडेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला हा निर्णय तुर्तास मंत्रिपदाचा राजीनामा नाही

मुंबईः विशेष प्रतिनिधी एका महिलेनी केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले. त्यामुळे मंत्रिमंडळातून मुंडे यांची गच्छंती अटळ मानली जात असतानाच त्यांना अभयदान मिळाले आहे. मुंडे यांच्यावरील आणि त्यांनी कथित महिलेने केलेल्या आरोपातील अनेक गोष्टींची कबुली दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्य मंत्रिमंडळाच्या प्रतिमेवर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची कृषी कायद्याला अखेर स्थगिती तीन महिन्यासाठी दिली स्थगिती, तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबईः विशेष प्रतिनिधी गेले दोन महिन्यापासून शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत केंद्र सरकारच्या तीन्ही कृषी कायद्याला साडेतीन महिन्यासाठी आज स्थगिती दिली असून हे या कायदे तीन अंमलात आणू नये असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला बजावले. तीन कृषी कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सलग …

Read More »

कृषी कायदे मागे घ्या नाहीतर…सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दट्या शेतकरी आंदोलन हाताळण्याच्या केंद्राच्या पध्दतीवर नाराज

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध कायम आहे. केंद्रानं दुरूस्ती करण्याची तयारी दर्शवली असली, तरी शेतकरी मात्र कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे मागील महिनाभरापासून दिल्लीत चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्या याचिकांवर सुनावणी …

Read More »

ऐकावे ते नवलचं, जमिन बिगर आदीवासींच्या नावे करायचीय? मग पुष्पगुच्छ तयार ठेवा मंत्री कार्यालयाकडून आलेल्या जमिनीच्या फाईलीच आम्ही करतो

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील आदिवासींना सन्मानाने जगता यावे यासाठी वनहक्क कायद्यान्वये आणि भारतीय राज्यघटनेतील तरतूदीनुसार ते कसत असलेली जमिन त्यांच्या नावावर करण्यात आली. परंतु मागील काही वर्षात वाढत्या शहरीकरणामुळे कधी काळी शहर हद्दीबाहेर असलेल्या वनजमिनी आता हद्दीत येवू लागल्याने आदिवासींच्या जमिनींना कोट्यावधींचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे या जमिनींची …

Read More »

आता सर्वोच्च न्यायालयानेही दिली गुटखा व्यापाऱ्यांवर या कलमाखाली कारवाईला परवानगी गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेचे कलम १८८ लागू होते,असा निर्णय उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री  डॉ राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन व पाठपुरावा केला व  राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा व मानदे …

Read More »