पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला थेट नाव घेत इशारा, टेरर आणि टॉक एकाचवेळी नाही पाकिस्तानने त्यांच्या देशातील अतिरेक्यांची स्थळे उद्वस्त करावीत

पहलगाम येथील बैसरण व्हॅलीतील दहशतवादी हल्ल्याला प्रत्यु्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशवाद्यांचे अड्डे भारताने उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्ताने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतावरही हल्ले करण्यास सुरुवात झाली. अखेर या युद्धग्रस्त तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मध्यस्थीने अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. त्यानंतर आज पहिल्यांदाच देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने दाखविलेला धाडसीपणा आणि त्यांनी मिळविलेले यश भारतीयांना अर्पण करत करत असल्याचे सांगत या शौर्याबद्दल भारतीय सैन्याला माझा सॅल्युट असल्याचेही यावेळी सांगितले.

पाकिस्तानला कडक इशारा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ‘ऑपरेशन सिंदूर’ ही दहशतवादाविरुद्धची भारताचे नवीन धोरण आहे, तर दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत हे पुन्हा सांगत पहलगाम हल्ल्याला दहशतवादी हल्ल्याला भारताने कडक भाषेत उत्तर दिले. तसेच जर कोणी भविष्यात भारतावर दहशतवादी हल्ला केला तर त्या दहशतवाद्यांना आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या देशाला आमच्या अटी आणि नियमानुसार प्रत्युत्तर देऊ असा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर कोणता देश अणुबॉम्बचा सहारा घेऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बळी पडणार नाही. तसेच सध्या आम्ही पाकिस्तानातील दहशवाद्यांच्या विरोधातील कारवाई स्थगित केली आहे. पण पुन्हा कोणी आगळीक करण्याचा प्रयत्न केल्यास त्यास सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा देत पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही पाकिस्तानशी यासंदर्भात बोलणार आहोत ते म्हणजे, दहशतवाद आणि बोलणे एकाचवेळी चालणार नाही, व्यापार आणि दहशतवाद एकाचवेळी हे आम्हाला चालणार नाही, सिंधू नदीचे पाणी आणि दहशतवाद हे ही एकाचवेळी चालणार नाही. इतकेच नव्हे तर आम्ही बोलू ते पाकव्याप्त काश्मीर बाबत बोलू असेही यावेळी पाकिस्तानला ठणकावून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, पाकिस्तानला जर पुढे जायचे आणि देशाचा विकास करायचा असेल तर त्यांनी त्यांच्या देशातील दहशवाद्यांना दिलेल्या सर्व पायाभूत सुविधा आणि त्यांची ठिकाणी त्यांनीच उद्धवस्त करावीत असे आवाहन करत अन्यथा ज्यासाठी ते दहशतवादाला थारा देत आहेत तो दहशतवादच पाकिस्तानला गिळून टाकेल असा इशारा देत पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादाची स्थळे उद्धवस्त केल्याशिवाय चर्चा नाही असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

युद्ध स्थितीतही भारताचे नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा दोन्ही नेत्यांची युद्धस्थितीनंतर सहकार्य करण्याच्या मुद्यावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१४ एप्रिल, २०२६) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय सहकार्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *