राज्यातील विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळवलेल्या महायुतीतील सत्ता स्थापनेच्या अंतर्गत घडामोडीवरील वाद अद्याप संपलेला दिसत नाही. त्यातच निवडणूकीचे संशयातीत निकाल लागून चार-पाच दिवस झाले तरी राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार, मुख्यमंत्री कोण होणार महायुतीतील घटक पक्षांना कोणती खाते देणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसह राजकिय वर्तुळात …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून एकनाथ शिंदेच्या भूमिकेचे स्वागत महायुती मजबूत आणि अभेद्य
महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मजबूत आणि अभेद्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली, ती राज्याच्या चौदा कोटी जनतेसाठी एक मोठी भूमिका असून आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व जो निर्णय करेल तो सर्वांनाच मान्य असेल, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे …
Read More »मुख्यमंत्री पदाबाबत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य सरकार स्थापनेत कोणताही अडथळा राहणार नाही, भाजपा नेत्यांची अडवणूक नाही
संशयातीत मतांच्या आकडेवारीसह बहुमताचा पाशवी आकडा गाठणाऱ्या भाजपा प्रणित महायुतीत अद्याप मुख्यमंत्री पदावरून चर्चा, बैठका यातच मतमोजणीचा निकाल जाहिर करून चार दिवस होत आले तरी मुख्यमंत्री पद कोणाकडे राहणार याचीच चर्चा सातत्याने सुरु होती. तसेच जरी भाजपाच्या जागा सर्वाधिक आलेल्या असल्या तरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आजही आपण आहोत असा संदेश …
Read More »एकनाथ शिंदे बनले काळजीवाहू मुख्यमंत्री, संशयातीत बहुमतानंतरही अद्याप चर्चाच नियमानुसार विद्यमान राज्य मंत्रिमडळाने दिला राजीनामा
विद्यमान विधानसभेची मुदत संपत आली आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणूकीशी संबधित प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यानुसार आज मंत्रिमंडळाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सीपी राधाकृष्णन …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करा मविआचे चांदिवलीचे उमेदवार नसीन खान यांच्या मुख्य पोलींग एजंटची निवडणूक आयोगाकडे तक्रार
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा …
Read More »बदलापूर चकमक प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्यासह अन्यांवर न्यायालयात याचिका मृत आरोपी अक्षय शिंदेच्या आईची न्यायालयात धाव
बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आईने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर राजकारणीविरोधात उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयात बदनामीचा दावा केला आहे. राजकीय लाभासाठी आपल्या मुलाच्या पोलीस चकमकीचे समर्थन केल्याचा दावा करून शिंदेच्या आईने माफीसह नुकसानभरपाईची मागणीही केली आहे. दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, त्यांच मन आणि हृदय रिकामं होतं… मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागात घोटाळा, सरकार आल्यावर चौकशी करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी करत २६-१२-२०२२ एमएमआरडीए MMRDAचे दोन पत्र यावेळी दाखविले. मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंग काम केलं जातय . मेट्रो २अ आणि मेट्रो ७च्या रंगरंगोटीसाठीचा एमएमआरडीए MMRDAने एक पत्र दिलं आहे, त्यानंतर ४ ऑक्टोबर निविदा काढण्यात आली …
Read More »“तर मी घरी बसेन” उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन संभाजीनगरातील प्रचारसभेत बोलताना आवाहन केले
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा पक्षाची सर्वाधिक चर्चा होती. मात्र लोकसभा निवडणूकीच्या काळात शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात सर्वाधिक जास्त लक्ष्य केंद्रीत केले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारात आणि शिवसेना उबाठाच्या उमेदवारापैकी कोण जिंकणार याबाबत उत्सुकता होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही महायुतीचे सरकार येताच नांदेडमध्ये एमआयडीसी मंजूर करणार
महायुती सरकारने दोन वर्षांत शेतकऱ्यांना १५००० कोटींची मदत केली. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्धार आम्ही केलाय. सोयबीन खरेदी केंद्र वाढवणार आहोत. किमान आधारभूत किंमतीतील तफावत भरुन काढण्यासाठी सरकारकडून भावांतर योजना लागू केली जाईल, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील प्रचारसभेत दिली. …
Read More »कांद्याच्या वाढत्या दराची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून दखल साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश
सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या वाढत्या दराचा फटका बसत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच पणन विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मोठ्या आणि लहान व्यापाऱ्यांना त्यांनी किती कांदा …
Read More »
Marathi e-Batmya