काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे दरे गावाहून निघताना म्हणाले, मला गावी आल्यावर आनंद मिळतो सरकार स्थापनेबाबत आणि मंत्री पदाच्या मागणीवरून स्पष्ट केली भूमिका

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा संशयातीत निकाल जाहिर होऊन आठ दिवस झाले तरी अद्याप राज्यातील संभावित मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला नाही. तरीही भाजपाकडून मुख्यमंत्री पदाचे नाव न जाहिर करताच ५ डिंसेंबर रोजी राज्यातील महायुतीचा शपथविधी होणार असल्याचे जाहिर करत या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते हजर राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मागील दोन-चार दिवसांपासून राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगितलेल्या आजारपणाच्या कारणामुळे त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी आहेत. त्यामुळे महायुतीतील मंत्री वाटपाची चर्चा थांबली. त्यामुळे महायुतीतील भाजपा नेत्यांच्या भूमिकेवरून उलट-सुलट चर्चेला सुरुवात झाली.

या सगळ्या घडामोडींवर आज अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे जाण्याआधी दरे येथे आपली भूमिका स्पष्ट करत आजारपण आणि दरे येथे असल्याने निर्माण झालेल्या चर्चांवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन करताना गावाला यायचं नाही का? असा काही नियम आहे का ? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत पुढे म्हणाले की, मी नेहमी गावी येत असतो, निवडणूकीत आम्ही महायुती म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडूण आलो आहे. निवडणूकीच्या काळात येवढे दौरे झाले, प्रचारसभा झाल्या, मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या कार्यकाळात थांबवलेली कामे पुन्हा सुरु केली, त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना आपण पाहिल्या लाडकी बहिण योजना असेल, मुलींच शिक्षण असेल, शेतकऱ्यांच्या योजना असेल अशा अनेक योजना आणत इतिहासात कधीही झाल्या नसतील अशा योजना आम्ही आणल्याचा सांगत आमचं सरकार हे सर्वसामान्यांच सरकार आहे. मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे मी गावी येत असतो. मला गावी आल्यानंतर आनंद मिळत असल्याचेही यावेळी सांगितले.

पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या मागणी आणि चर्चेबाबत विचारले असता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साहजिकच आहे. जनतेच्या मनात मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमन मॅन म्हणून जे काही केलं तशा भावना सर्वसामान्यांच्या आहेत. तसेच मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणूका झाल्या. दोन्ही मुख्यमंत्री सोबत होते बाकीचे सहकारीही सोबत होते. त्यामुळे हे मोठं यश मिळालं. यामध्ये संभ्रम नको. त्यामुळे मी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत मुखमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जे निर्णय घेतील तो मान्य असेल असे सांगत त्यास आमचा पाठिंबा राहणार असल्याचेही त्यावेळी सांगितले.

शिवसेनेला गृहखातं हवं आहे का असं विचारलं असता काळाजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या सर्व गोष्टीबाबत चर्चा होईल, चर्चांमधून अनेक गोष्टींवर मार्ग निघेल. तसेच अनेक गोष्टी त्यामधून सुटतील आम्हाला लोकांनी निवडूण दिलं आहे. त्या लोकांना जी आश्वासने दिली आहेत. आमची लोकांशी बांधिलकी आहे. त्यामुळे त्यांना मिळणार हे महत्वाचं असून आम्हाला काय मिळणार हे महत्वाचं नसल्याचंही यावेळी स्पष्ट करत त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करत राहू असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू १० मार्च पर्यंत करता येणार अर्ज

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *