महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनाला ७ डिसेंबर या दिवशी प्रारंभ झाला. मात्र आज विधानसभेचे अधिवेशन सुरु होताच राज्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत मारकडवाडी प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत ईव्हीएम विरोधी घोषणा देत शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ४९ सदस्यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही. परंतु सत्ताधारी महायुतीतील भाजपा, शिवसेना …
Read More »अजित पवार यांचा पलटवार, ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळतेय आम्ही महाविकास आघाडीत काम केलेय
महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी बोलताना केला. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम केले आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष …
Read More »नाना पटोले यांची टीका, मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून सदस्यत्वाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय बॅलेट पेपरवर मतदान ही मारकडवाडीत पडलेली ठिणगी देशभरात पोहचवण्याचा काँग्रेसचा संकल्प
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती …
Read More »उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकिय निवासस्थान आता वर्षा बंगला, तर… मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान म्हणून सागर बंगला?
राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरील असे मिळून तिघांचा शपथविधी नुकताच पार पडला. परंतु मागील अनेक दशकांपासून मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा वर्षा बंगला मात्र यापुढे मुख्यमंत्र्यांचा बंगला नव्हे तर उपमुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ओळखला जाणार असून विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री म्हणून रहात असलेला सागर बंगला मात्र …
Read More »नाना पटोले यांची टीका, ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पुर्वजच खरे गद्दार व देशद्रोही अदानीच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्यानेच भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानीच्या भ्रष्टाचारावर चौकशी करण्याची मागणी करताच अदानीचे दलाल राहुल गांधींची बदनामी करु लागले आहेत. जेव्हा जेव्हा अदानीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केले जाते तेव्हा तेव्हा अदानीचे दलाल भाजपाचे नेते काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बेछुट आरोप करतात. आताही भाजपाचा टुकार खासदार संबित पात्राने राहुल गांधी …
Read More »भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे निधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाहिली आदरांजली
भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात …
Read More »मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांचे ते स्पप्न अधुरेच राहणार? विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान केली होती घोषणा
राज्यात १५ वर्षात काही अंतराने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद भूषणविणारे भाजपाचे नेते तथा विद्यमान संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांना आता महाराष्ट्रावरच लक्ष्य केंद्रीय करून रहावे लागणार असल्याने त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान विदर्भात केलेल्या घोषणेचे स्वप्न …
Read More »विधानसभा विशेष अधिवेशन उद्यापासून, हंगामी अध्यक्ष पदी कालीदास कोळंबकर विधानसभेचे तीन दिवस अधिवेशन मुंबईत
राज्यात नव्याने सत्तेवर स्थानापन्न झालेल्या संशयातीत बहुमाताचा आकडा गाठणारे भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तास्थानी विराजमान झाले. सांसदिय प्रथेप्रमाणे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून त्याद्वारे राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणे आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करणे आदी गोष्टी करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विधानसभेचे खास अधिवेशन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बदल्यांचे नव्हे तर बदल करण्याचे राजकारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार
राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, यावेळचे राजकारण खूप वेगळे राहणार आहे. मला बदल्यांचे नाही तर बदल घडविण्याचे राजकारण करायचे असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना देवेंद्र …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्यात रोल बदलले असले तरी… आता महाराष्ट्र थांबणार नाही-पत्रकार संघातील वार्तालापावेळी देवेंद्र फडणवीस यांची माहिती
राज्याच्या मुख्यमंत्री पदी जरी यावेळी मी आलो असलो तरी यापूर्वी मी आणि अजित पवार हे दोघे म्हणून औटघटकेचे सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी उपमुख्यमंत्री तर अजित पवार नंतर आमच्यासोबत आले तेही उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आज मी मुख्यमंत्री झालो, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आमच्यासोबत …
Read More »
Marathi e-Batmya