एक-दोन वर्षापूर्वी ईडीच्या नोटीसा आणि भाजपाचा वाढता दबाव यामुळे शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेतील एक मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला. तसेच मुंबईतील अनेक खासदारही शिंदे यांच्यासोबत गेले. त्यात ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटाची वाट धरली. मात्र आता लोकसभा निवडणूकीला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असून …
Read More »शरद पवार म्हणाले, आगामी निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वाची
देशाचे भविष्य आणि भवितव्यासाठी निवडणुका आहेत. देशाचे अनेक जणांनी नेतृत्व केलं. देशाच्या भवितव्यची चिंता कधी नव्हती. पण गेले दहा वर्ष पाहिलं असता, आता बदल केला पाहिजे असं वाटतंय असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर इथे आयोजित महाविकास आघाडीच्या वतीने …
Read More »महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात चेहरा उद्धव ठाकरेः वंचित म्हणते आधी प्रस्तावावर चर्चा
आगामी निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे. तसतसे निवडणूकीच्या प्रचारात आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. उत्तर भारतातील सर्व राज्यांसह पश्चिम बंगाल राज्यातही भाजपाकडून प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील जागा वाटपाबाबत भाजपाने अद्याप पत्ते उघड केले नाहीत. तर दुसऱ्याबाजूला महाराष्ट्रात भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …
Read More »उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाला तडीपारीची नोटीस दिलीय त्यावर तुम्हाला शिक्कामोर्तब…
‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास आहे, तर पक्ष फोडाफोडी कशाला करताय?शिवसेना नसती आणि शिवसेनेनं तुम्हाला खांद्यावर बसवून महाराष्ट्र फिरवला नसता, तर तुम्हाला खांदा द्यायलाही चार लोकं आली नसती. आजपर्यंत भाजपाएवढा खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आलेला नाही. मी मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाचं नाव ‘दि. बा. पाटील’ दिल होतं. त्याचं …
Read More »भाजपाचा पलटवार, अंधभक्त आणि श्रध्येतील फरकच उद्धव ठाकरेंना कळत नाही
अंधभक्त आणि श्रद्धा यातील फरकच दुर्दैवाने उद्धव ठाकरेंना समजत नाही. बाळासाहेबांप्रती लाखो शिवसैनिकांची, सर्वसामान्य जनतेची श्रद्धा होती. ते अंधभक्त नव्हते. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीबाच्या कल्याणाकरीता करत असलेली कामे व विकासकामे यामुळे देशातील जनतेच्या श्रद्धा मोदींच्या प्रती आहेत. तुम्ही डोळ्याला झापड बांधली असल्यामुळे श्रद्धा तुम्हाला अंधभक्तासारखी दिसून येते, असा खरमरीत …
Read More »उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, अब की बार भाजपा तडीपार
आगामी लोकसभा निवडमूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांनी एकाबाजूला निवडणूकीची तयारी जोरात केलेली असतानाच जनता दल संयुक्तचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील यांनी जनता दल संयुक्त पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्यावतीनं आयोजित पहिल्याच मेळाव्याला मार्गदर्शन आणि राजकिय मित्र म्हणून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी …
Read More »उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालय
नागपूर येथील रिपब्लिकन सेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, मागील काही वर्षात जशी शहरांची नावं बदलली, रेल्वे स्थानकांची नावं बदलली तसं आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालेले आहे …
Read More »प्रकाश आंबेडकर का म्हणाले? मविआच्या बैठकांना जाऊ नका
राज्यातील राष्ट्रीय आणि प्रादेशिकस्तरावरील राजकिय पक्षांसोबतच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर कधी अडकून नाहीत. परंतु प्रत्येक निवडणूकीत त्यांनी नेहमीच स्वतःचे अस्तित्व दाखवून दिल्याचे दिसून आले आहे. काल संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील लोकसभा मतदारसंघातील जाहिर सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आणि महाविकास आघाडी …
Read More »अंबादास दानवे यांची टीका, अंतरीम अर्थसंकल्पातून कंत्राटदारांना पोसण्याचं काम
पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पात कंत्राटदारांना पोसण्याचं काम या सरकारने केलं आहे. जनतेच्या हाती केवळ भोपळा देण्याचं काम सरकारने केल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत सरकारवर विविध विषयांवर जोरदार हल्ला चढविला. अर्थसंकल्पिय अधिवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे बोलत होते. अंबादास दानवे म्हणाले की, सरकारने आणलेला सहकार विधेयक हे …
Read More »‘अर्थसंकल्पात घोषणाचा सुकाळ, शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ’
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला.राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याने राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधक आक्रमक होत ‘अर्थसंकल्पात घोषणांचा …
Read More »
Marathi e-Batmya