उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालय

नागपूर येथील रिपब्लिकन सेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, मागील काही वर्षात जशी शहरांची नावं बदलली, रेल्वे स्थानकांची नावं बदलली तसं आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालेले आहे अशी खोचक टीका नरेंद्र मोदी आणि भाजपावर केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जर भाजपा ईव्हीएम घोटाळा करून निवडणूका जिंकणार असेल तर देशातील जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होईल. तोडा, फोडा आणि राज्य करा हे फार काळ चालणार नाही असा इशाराही यावेळी भाजपाला दिला.

भाजपाने जाहिर केलेल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीबाबत मत व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाने जी उमेदवारांची यादी जारी केली आहे. त्यात निष्ठावंत नितीन गडकरी याचं नाव नाही. मात्र ज्यांने बेहिशोबी मालमत्ता जमा केली त्या कृपाशंकर सिंग याचं मात्र नाव आहे. ही आजची भाजपा असल्याची टीका करत आम्हाला तर यापूर्वी नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही नावं ही माहित नव्हती. आम्ही फक्त लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनाच ओळखचो असेही सांगितले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोण कितीही मोठा हुकूमशहा असला तरी तो जनतेच्या रेट्यासमोर टीकत नाही. त्याला जनतेसमोर झुकावचं लागतं असा गर्भित इशाराही यावेळी भाजपाच्या नेत्यांना दिला. तसेच आता आपल्याला दिल्लीच्या सत्तेच्या वाटेकडे चालायच आहे असे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.

About Editor

Check Also

माधुरी मिसाळ यांची माहिती, १० हजार बसची आवश्यकता बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार

मुंबईतील बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *