मुंबई काँग्रेसने गुरुवारी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून धारावीच्या आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. या जागेवरून वर्षा गायकवाड यांना तिकीट मिळाल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीच्या जागांच्या वाटपात मुंबईत उत्तर …
Read More »प्रविण दरेकर यांची टीका, टोमणे मारणे हा उद्धव ठाकरेंचा स्थायीभाव
उद्धव ठाकरेंना केवळ बडबड करण्यापेक्षा दुसरे काहीच येत नाही. त्यांना ना महाराष्ट्राचे प्रश्न माहित, ना त्यांनी कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. फक्त उचलली जीभ लावली टाळ्याला एवढंच बडबड करण्याचे आणि मत्सराने, द्वेषाने टोमणे मारणे हा उद्धव ठाकरेंचा स्थायीभाव झाला असल्याची टीका भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, सांगली काँग्रेसला द्रष्ट लावणाऱ्यांची द्रष्ट उतरवल्याशिवाय…
लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनिया गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना व दुःख समजतो, तुमच्या भावनांचे चीज करू, काँग्रेसचे कुटुंब एकसंध राहिले पाहिजे, तुमच्या वेदनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु आता मशाल पेटवायची आहे. सांगली काँग्रेसला ज्यांनी द्रष्ट लावण्याचे काम केले त्याची …
Read More »निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींच्या विरोधातील तक्रारीबद्दल नड्डा यांना नोटीस
केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना नोटीस बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींवर पक्षाचे उत्तर मागितले आहे. ईसीआयने भाजपला २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. अशीच नोटीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजपाने राहुल गांधींविरोधात केलेल्या तक्रारींवरून बजावली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाध्यक्षांना …
Read More »राहुल गांधी यांची घोषणा, इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी
लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. इंडिया आघाडी लोकशाही व संविधानाचे रक्षण करत असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्यांचे …
Read More »नाना पटोले यांची घोषणा, विधान परिषदेची कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार
आगामी विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल. मागील काही महिन्यांपासून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागात पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, माकपासह इतर मित्रपक्ष यांची महाविकास …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी काँग्रेस प्रणित युपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा केला. भाजपाप्रणित शिंदे सरकारने मात्र या कायद्यात मनमानी व बेकायदेशीर बदल करून वंचित व दुर्बल घटकांतील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आणली आहे. गोरगरीब, वंचित आणि बहुजन …
Read More »राहुल गांधी यांची २४ एप्रिलला अमरावती व सोलापुरात जाहीर सभा
लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पहिली सभा पार पडली. त्यानंतर महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्या बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अमरावती मतदार संघातील इंडिया आघाडीचे अधिकृत …
Read More »विनोद तावडे यांचा टीका, संविधान ८० वेळा बदलणाऱ्या काँग्रेसचा…
गोव्यातल्या काँग्रेस उमेदवाराने गोव्यात भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी केली आहे, तर कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने अशीच मागणी काही दिवसा पूर्वी केली होती. यावरून काँग्रेसलाच संविधानाविषयी आदर नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. प्रदेश मुख्य प्रवक्ते …
Read More »नाना पटोले यांचा टोला, भाजपाने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीत. काँग्रेसने दलित व मुस्लीमांचा व्होट बँक म्हणून वापर केला असे बोलण्याआधी एकनाथ शिंदे यांनी अभ्यास करायला हवा. स्वातंत्र्यापासून ६०-६५ वर्ष देशात सर्व जाती धर्माचे लोक भयमुक्त वातावरणात रहात होते ते काँग्रेस सरकारमुळेच. भाजपाच्या राज्यात दलित, आदिवासी, …
Read More »
Marathi e-Batmya