राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी रोजगारनिर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबतच्या …
Read More »कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून राजापूर, बुरलेवाडी येथील दुष्काळ परिस्थितीची पाहणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगोला तालुक्यातील राजापूर व बुरलेवाडी येथे दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून खरीप पिकांची सद्यस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाचे प्रमाण, पिकांची वाढ, पाणी उपलब्धता आणि शेतीच्या नुकसानीबाबत माहिती जाणून घेतली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय …
Read More »कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीस राज्यभरातून महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी ३७ लाखांहून अधिक महिलांचे अर्ज प्राप्त
महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील योगदानाची अधिकृत ओळख मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज ७ ऑक्टोबर पर्यंत राज्यभरातून तब्बल ३७ लाख ९३ हजार ०५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील प्रत्येक पात्र महिला शेतकरी या उपक्रमाशी जोडली जावी, यासाठी कृषी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीकडे शासन अतिशय गांभीर्याने पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी आजपासूनच पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातील पहिली अधिसूचना निघणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. झालेल्या नुकसानीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीत …
Read More »महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत कृषी विभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम
“शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र अनेक वेळा शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळत नाही. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमामुळे ही परिस्थिती बदलणार असून, महिलांना अधिकृत ओळख, शासकीय योजनांचा लाभ, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा आणि विस्तार सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आवाहन, भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळण्यासाठी एकत्र काम करावे पुण्यात आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद–२०२६
भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाचे, सुरक्षित आणि विश्वासार्ह उत्पादन म्हणून नवी ओळख मिळवून देण्यासाठी केवळ उत्पादन वाढविणे पुरेसे नाही. गुणवत्ता, उत्पादकता, निर्यात, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यावरही भर देत शेतकरी, वैज्ञानिक, उद्योजक आणि शासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यशदा, पुणे येथे …
Read More »कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश; कडधान्य बियाण्यांच्या अनुदानात भरीव वाढ तूर, उडीद, मसूरच्या प्रमाणित बियाण्यांसाठी आता १०० टक्क्यांपर्यंत अनुदान, हरभरा व इतर कडधान्यांनाही मोठा लाभ
उत्तम प्रतीचे प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाले, तर कडधान्यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल. शेतकऱ्यांचा बियाणे वापर वाढावा आणि कडधान्य उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी कायम ठेवावी, यासाठी केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘कडधान्य आत्मनिर्भरता …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्र आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कामासाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर आज प्रदान करण्यात आलेला पुरस्कार हा राज्यातील शेतकरी, महिला, युवा, स्वयं सहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म उद्योजकां आणि कृषी विभागाच्या अथक मेहनतीची पावती आहे. या सन्मानामुळे कृषीमालाचे अधिकाधिक मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आणि ग्रामीण रोजगाराला बळ देण्याची …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार निवड
कृषी विभागाने राज्यातील शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन, आयओटी सेन्सर्स आणि डेटा अॅनालिटिक्सवर आधारित अभ्यास करावा. कापूस, सोयाबीन, तूर,ऊस,संत्रे,हळद,कांदा व मका या पिकांसाठी ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा हजार शेतकऱ्यांची निवड करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »दिल्लीत महाराष्ट्र, कृषी विभागाचा राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान महाराष्ट्राच्या उल्लेखनीय कामगिरीचा केंद्राकडून गौरव; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत महाराष्ट्राने (कृषी विभाग) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याची दखल घेत भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. या कामगिरीबद्दल केंद्र सरकारच्या वतीने दि.२४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित पीएमएफएमई कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राला …
Read More »
Marathi e-Batmya