भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्य यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मुल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकला जोडणाऱ्या महामार्गाबाबत बैठक
नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. याबाबत लवकरच डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल़, असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृषी तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा 'क्लिन प्लांट’कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान
बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला साहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. पुणे ॲग्री हॅकॅथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करणे आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पहिल्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’च्या पारितोषिक वितरण आणि समारोप सभारंभात ते बोलत होते. कृषी …
Read More »पियुष गोयल यांचे पहलगाम हल्ल्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य,…मग असे हल्ले होत राहणार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पियुष गोयल यांच्यावर टीका
काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. त्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशात अद्याप अनेकांना दुःख झालेले आहे. तसेच या दुःखातून अद्याप अनेक जण बाहेर आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या …
Read More »सुप्रिया सुळे यांची मागणी, पहलगाम प्रकरणी सर्वपक्षियांना बोलावून माहिती द्या कश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी याचा करावा तेवढा निषेध कमीच
जम्मू – काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी आहे. याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून आपण कितीही निषेध केला तरी तो अपुरा ठरेल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, …
Read More »नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
ज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये शेतीपुरक उद्योगाने चांगला आकार घेतल्याचे आपल्या निर्दशनास येते. या दृष्टीने विचार करुन नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थापक प्रशासकत्वाची जबाबदारी आजपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द …
Read More »पंतप्रधान मोदी यांची रेशीमबागेतील आरएसएसच्या मुख्यालयास भेट डॉ हेडगेवार आणि गोळवळकर गुरूजींच्या स्मृतीस्थळाचे घेतले दर्शन
नागपूर येथील आरएसएस मुख्यालयाला भेट देणारे पंतप्रधान मोदी म्हणाले की, संघ हा भारताच्या अमर संस्कृती आणि आधुनिकीकरणाच्या वटवृक्षासारखा आहे. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिक्षाभूमीला भेट दिली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय …
Read More »सेमीकंडक्टर चिप डिसाईनसाठी अॅनालॉग आणि डिजिटल हॅकेथॉन आयटीमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून विजेत्यांची घोषणा
भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमला मोठी चालना देण्यासाठी, चिप्स टू स्टार्ट-अप (C2S) कार्यक्रमांतर्गत “अॅनालॉग आणि डिजिटल हॅकेथॉन” द्वारे आयआयटी दिल्ली, आयआयटी बॉम्बे, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी (बीएचयू) वाराणसी, एनआयटी राउरकेला आणि सवेथा अभियांत्रिकी महाविद्यालय यासारख्या शीर्ष अभियांत्रिकी संस्था चिप्स टू स्टार्ट-अप (C2S) कार्यक्रमांतर्गत “अॅनालॉग आणि डिजिटल हॅकेथॉन” द्वारे चिप डिझाइन इनोव्हेशनमध्ये आघाडीवर आहेत. …
Read More »नितीन गडकरी यांच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली निवडणूकी संदर्भात दाखल केली होती याचिका
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिलासा देत, मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर मतदारसंघातून १८ व्या लोकसभेवर निवडून आल्याबद्दल दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत त्यांनी त्यांचे फोटो आणि भाजपचे चिन्ह असलेले मतदार स्लिप छापून मतदारांना वाटून ‘गैरव्यवहार’ केल्याचा आरोप होता. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या एकल न्यायाधीश न्यायमूर्ती …
Read More »नितीन गडकरी यांची घोषणा, नवे टोल धोरण लवकरच जाहिर राज्यसभेत बोलताना दिली माहिती
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी घोषणा केली की सरकार लवकरच ग्राहकांना वाजवी सवलती देणारे नवीन टोल धोरण आणणार आहे. राज्यसभेत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, भारतातील विस्तारणाऱ्या रस्ते पायाभूत सुविधांना निधी देण्यासाठी टोल शुल्क आवश्यक असले तरी, सरकार ही व्यवस्था अधिक ग्राहक-अनुकूल बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. …
Read More »
Marathi e-Batmya