Tag Archives: भाजपा

आशिष शेलार यांची माहिती, अमित ठाकरेंना समर्थन.. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

“हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे चिरंजीव निवडणुकीच्या मैदानात उतरले असतील, तर आपणही नाते जपायला हवे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील, तर महायुती म्हणून त्यांना समर्थन द्यायला हवे, असे मला वाटते. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार …

Read More »

भाजपाची स्टार प्रचारकांची यादी जाहिर,पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शाह ४० प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर

शुक्रवारी भाजपाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केली. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पंकजा मुंडे आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा हे महाराष्ट्र विधानसभेत आणि नांदेडमधील भाजपाचे स्टार प्रचारक राहणार आहेत. लोकसभा पोटनिवडणूक, …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर १३ कोटींची चल अचल संपत्ती पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावेही कोट्यावधी रूपयांची मालमता पण गाडी नावावर नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपयांची चल आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली. त्याच्या कर रिटर्न फॉर्मनुसार, २०२३-२४ मध्ये त्याचे एकूण उत्पन्न ७९ लाख ३० हजार ४०२ रुपये होते तर …

Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या १२ उमेदवारांचे अर्ज दाखल भाजपाची माहिती, फडणवीसांसोबत नितीन गडजकरी, बावनकुळे उपस्थितीत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. दिवसभरात भाजपाच्या एकूण १२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी अर्ज दाखल …

Read More »

संजय राऊत यांना जामीन मंजूर सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर दिली जामीन

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी माझंगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला. अब्रुनुकसानी याचिकेप्रकरणी ठोठावलेल्या शिक्षेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, संजय राऊत यांनी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहून जामीनासाठी अपील …

Read More »

नाना पटोले यांची टीका, राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नेरेटिव्हचा भाजपाचा प्रयत्न लोकशाही व संविधान वाचवण्यासाठीच राहुल गांधींची लढाई; भाजपाचा मात्र मनुस्मृती लादण्याचा कुटील डाव

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भितीने भारतीय जनता पक्षच सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण व संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. …

Read More »

भाजपाच्या दोन माजी खासदारांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसची ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ;या यादीत सना मलिक - शेख आणि झिशान सिद्दीकी हे दोन तरुण मुस्लिम चेहरे...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी २३ ऑक्टोबरला जाहीर केल्यानंतर आज ७ उमेदवारांची दुसरी यादी प्रदेश कार्यालयात जाहीर केली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी आज जाहिर झाली. या यादीत नवाब मलिक यांच्या उमेदवारी ऐवजी त्यांची कन्या सना मलिक-शेख यांना अनुशक्ती …

Read More »

खिचडी घोटाळा प्रकरण : सुरज चव्हाण यांचे अटकेला आणि ईडी कोठडीला आव्हान उच्च न्यायालयाने बजावली प्रतिवाद्यांना नोटीस

कोरोनाकाळात मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांनी अटकेला तसेच सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) कोठडीला आव्हान दिले आहे. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवाध्यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना १७ जानेवारीला खिचडी घोटाळा प्रकरणी …

Read More »

सागर बंगल्याला नाराजांची भरती पहिल्या यादीनंतर नाराज भाजपा उमेदवार-आमदारांची रिघ

विधानसभा निवडणुकीची एकहाती सूत्रे भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. त्यातच भाजपाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर राज्यातील अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहिर केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संधी मिळावी यासाठी उमेदवारी जाहिर न झालेल्या नाराज उमेदवारांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर एकच गर्दी केली. त्यामुळे सागर …

Read More »

अफवांवरील चर्चेला संजय राऊत यांचे उत्तर, एक तर बाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला भाजपाचा खोटारडेपणाः महाविकास आघाडीत २१० जागांवर एकमत

सकाळपासून शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची आणि संजय राऊत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त आज सकाळपासून विविध प्रसारमाध्यमांवर सुरु होते. या वृत्तावर अखेर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते तथा नेते संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) विधानसभेच्या २८८ …

Read More »