मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कोविड काळात रोखण्यात आलेला महागाई भत्ता १ ऑक्टोंबर २०२१ रोजी पासून रोखीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. विशेष म्हणजे १ जानेवारी २०२० ते १ जून २०२१ पर्यतचा महागाई भत्त्याचा दर १७ टक्के इतका निश्चिक करण्यात आला असून १ ऑक्टोंबरपासून रोखीने देण्यात येणार असल्याचा …
Read More »आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना- राष्ट्रवादी आळवणार हिंदूत्वाचा राग भाजपाचे हिंदूत्वाचे पेटंट हिसकावून घेणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात महाविकास आघाडीला चांगल्यापैकी यश आल्यानंतर आजपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानुसार सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात आली खरी मात्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्निक मुंबादेवीचे दर्शन घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रभादेवी येथील सिध्दीविनायकाचे दर्शन घेवून पुणे …
Read More »आमचे नेते घाबरणारे नाही… उलट सरकार अजून भक्कम होतेय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईः प्रतिनिधी ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या सर्व यंत्रणांचा वापर महाराष्ट्रातील सरकार व नेत्यांविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी केला जातोय. परंतु आमचे नेते घाबरणारे नाही उलट सरकार अजून भक्कम होतेय असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या …
Read More »३३ टक्के किंवा त्याहून अधिक शेतीनुकसान झालेल्या बाधितांना मिळणार भरपाई गारपीट व अवेळी पावसामुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी १२२ कोटी मंजूर
मुंबई : प्रतिनिधी गारपीट व अवेळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने शेतपिकाच्या …
Read More »आशिष शेलारांच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर मी कधीही अशा गोष्टीला महत्व देत नाही
पुणे: प्रतिनिधी आज त्यांचे सरकार नाही ही त्यांची खंत आहे. त्यांचे दुखणे इतकं मोठे आहे की त्यावर दुसरं काहीही न करता गरळ ओकायची सवय लागली आहे. त्यामुळे मी कधीही त्या गोष्टीला महत्व देत नाही असं सांगत आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. महाविकासआघाडी सरकारमध्ये सुरू …
Read More »मी धनंजय बोलतोय, तुम्ही व्यवस्थित, सुरक्षित आहात ना काळजी करु नका धनंजय मुंडे घटनास्थळी, रात्रीतून वेगाने मदतकार्य झाल्याने जीवितहानी टळली
अंबाजोगाई: प्रतिनिधी “मी धनंजय बोलतोय, तुम्ही व्यवस्थित, सुरक्षित आहात ना? किती जण व कुठे अडकलेले आहात? बोट मदतीला आली आहे का? काळजी करू नका;” असे बोलून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांची विचारपूस केली. देवळा ता.अंबाजोगाई येथील ५१ जण मांजरा …
Read More »देशातील जीएसटी प्रणालीची धुरा आता अर्थमंत्री अजित पवारांच्या हाती ‘जीएसटी’ सोपी, दोषविरहीत करण्यासाठी अर्थमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रीगट स्थापन
मुंबई: प्रतिनिधी वस्तू व सेवा करप्रणालीतील (जीएसटी) त्रूटी दूर करुन ती सहज, सोपी करण्यासंदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रीगट स्थापन करण्यात आला आहे. मंत्रीगटाने शिफारस केलेल्या आणि जीएसटी परीषदेने मंजूर केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीवर देखील हाच मंत्रीगट देखरेख ठेवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यासंदर्भातील …
Read More »अजित पवार म्हणाले, आम्हाला कळायचंच नाही हे काय चाललंय… पर्यटन विभागाच्या बजेटचा सांगितला किस्सा
मुंबईः प्रतिनिधी अनेकजण देश-विदेशात फिरुन आलेले आहेत. परंतु अनेकांनी महाराष्ट्र अजून नीट बघितलेला नाही. जग फिरण्याआधी पहिल्यांदा आपला महाराष्ट्र फिरला पाहीजे. आपली पर्यटन स्थळ बघितली पाहीजे. त्यानंतर जग बघायला बाहेर पडा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पर्यटन दिनाचे औचित्य साधत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी …
Read More »संजय राऊतांनी अजित पवारांना मिश्किल विनंती करत दिला इशारा अजित पवार मुख्यमंत्र्यांचं ऐकतात आपण त्यांना सांगू
पुणे : प्रतिनिधी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणून निवडणूकांना सामोरे जायचं की स्वतंत्र जायचं याबाबत अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे एकमत झालेले नाही. त्यामुळे कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसकडून एकला चलो चा नारा देण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीबरोबरील …
Read More »निवडणूक आयोगाने कळवले मविआ सरकारला, “विनंती स्विकारू शकत नाही” सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तरच निवडणूक थांबविणार
मुंबई : प्रतिनिधी ओबीसींचे राजकिय आरक्षण वाचविण्यासाठी म्हणून राज्य सरकारने सुधारीत अध्यादेश काढण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंजुरी घेतली. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त ओबीसींच्या जागांच्या निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे केली. परंतु या नव्या अध्यादेशानुसार निवडणूका घेण्यास असमर्थता दर्शवित महाविकास आघाडीची विनंती राज्य निवडणूक …
Read More »
Marathi e-Batmya