मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील एखाद्या क्रिमिनल किंवा दिवाणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयासह देशातील कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिली असेल मात्र त्यास ६ महिन्याचा कालावधी उलटून गेला असेल तर त्या स्थगितीचा आदेश आपोआप रद्दबातल होणार असल्याचा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जाहीर केला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हे आदेश जारी करण्यात आल्याचे …
Read More »मास्कच्या किंमतीचा शासन निर्णय जाहीर: चढ्या किंमतीविरोधात येथे तक्रार करा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार आहे. आज …
Read More »…तर रूग्णालयांवर कारवाई करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे : प्रतिनिधी कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयावर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा …
Read More »इतक्या शाळांना मिळणार अनुदान अनुदानामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना लाभ
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुन्हा एकदा अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सध्याच्या कोरोना काळामुळे हे अनुदान मिळणे अशक्य वाटत होते. मात्र या शाळांना २० टक्के अनुदान वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या निर्णयाचा एकूण २१६५ शाळांना २० टक्के देण्याचा निर्णय घेतला असून …
Read More »राज्यातील विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ७ वेतन आयोग लागू राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुधारित वेतनश्रेणी १ नोव्हेंबर २०२० पासून लागू होईल. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांची वेतनश्रेणी अचूक आहे तसेच ज्या पदांची पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी …
Read More »शाळा १५ ऑक्टोंबर नव्हे तर दिवाळीनंतरच; अहवाल सादर करा ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी अनलॉक-५ अंतर्गत देशभरातील सर्व शाळा १५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारवर सोपविले. मात्र राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार अद्यापही उत्सुक नसून साधारणत: दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा विचार करत असून याअनुषंगाने ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेवून त्यासंदर्भातील अहवाल …
Read More »केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केल्या या सूचना केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर कराव्या लागणार –मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी कृषी न्यायालय स्थापन करावे, बाजार समित्या अधिक मजबूत कराव्यात, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल हे पाहून हमी भावाचे संरक्षण काढून घेऊ नये, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी अधिकचे कायदे करावे, करार शेतीमध्ये फसगत होण्याची शक्यता आहे, हमी भावापेक्षा कमी किमतीत कोणाला शेतमाल खरेदी करता येणार नाही अशी तरतूद करावी, …
Read More »अर्धवट खुशखबर: एस.टी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार आठवड्यात मिळणार उरलेल्या पगारीबाबत चर्चा करून निर्णय- परिवहन मंत्री परब यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात एसटीची सेवा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी फक्त वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळ आणखी आर्थिक चक्रात अडकले. यापार्श्वभूमीवर मागील चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. अखेर यातील एका महिन्याचे वेतन या कर्मचाऱ्यांना …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा मंत्रिमंडळाने फेटाळत केली उपसमितीची स्थापना केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती
मुंबई : प्रतिनिधी नुकतेच केंद्र सरकारने संसदेत कृषी विषयक तीन विधेयके मंजूर केली. मात्र ही विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केली होती. तसेच याविषयीचे वृत्तही काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले. परंतु आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखआली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित …
Read More »सरकारचा मोठा निर्णय : अखेर त्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या- मुख्यमंत्र्यांचे आदेश आरे वृक्षतोड विरोधी आंदोलकर्त्यांना दिलासा
मुंबई: प्रतिनिधी आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनी देखील याला अनुमोदन दिले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे लगेच मागे घेण्याची कार्यवाही करावी …
Read More »
Marathi e-Batmya