Tag Archives: ajit pawar

अजित पवार म्हणतात दिलेला शब्द फिरविणाऱ्यातला मी नाही भाजप आमदार शेलारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी मी माझ्या जीवनात एकदा दिलेला शब्द कधीही फिरवित नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्याबाबत मी मांडलेली भूमिका कालही तीच होती आजचही तीच आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर हे आरक्षण न्यायालयात टिकणारे हवे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने काय अहवाल दिला? याची माहिती सभागृहाला मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत …

Read More »

मराठा, धनगर आरक्षणाच्या अहवालावरून विधानसभा तिसऱ्या दिवशीही तहकूब अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग आणि टाटा सामाजिक विज्ञान अर्थात टीसचा अहवाल विधानसभेत मांडण्याच्या मागणीवरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच हे दोन्ही अहवाल सभागृहात आजच मांडावा या मागणीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा …

Read More »

अखेर मागास आयोगाच्या अहवालावरून अजित पवार यांची सारवासारव अहवाल सभागृहात मांडण्याने आवश्यकच

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला अहवाल सादर केला. हा अहवाल विधानसभेत ठेवणे आवश्यक असून त्यामाध्यमातून जनतेलाही कळणे आवश्यक आहे. त्यामुळे विधानसभेत यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याची सारवासारव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधानसभेत केलेल्या वक्तव्यामुळे …

Read More »

दुष्काळावरून विरोधकांनी खालच्या पातळीवरील राजकारण थांबवावे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विरोधकांना आवाहन

मुंबईः प्रतिनिधी राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असताना विरोधक याप्रश्नावर राजकारण करत आहेत. हा संवेदनशील मुद्दा असून दोघांनी मिळून जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजे. तसेच या मुद्यावरून विरोधक खालच्या स्तराला जात असून यासंबधीचे राजकारण थांबविले पाहिजे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करत कदाचीत विरोधक भांबावले असल्याने ते असे खालच्या पातळीवरचे राजकारण …

Read More »

मुख्यमंत्री…जलयुक्तवरील खर्च झालेल्या साडेसात हजार कोटीचा हिशोब दया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी जलयक्त शिवार योजनेबाबत जलतज्ज्ञांनी हे तांत्रिकदृष्टया योग्य काम होत नसल्याचे आरोप केले होते. जीएसडीएने दिलेल्या २५२ तालुक्यातील १० हजार ५२१ गावांमधील अडीच मीटरने भूजल पातळी घटल्याचा अहवाल दिला आहे मग जलयुक्त शिवार कसले यशस्वी झाले असा सवाल करतानाच यावर खर्च झालेल्या साडेसात हजार कोटी रुपयांचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी दयावा …

Read More »

दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार दया आणि भारनियमनमुक्त महाराष्ट्र करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत दया शिवाय महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना केंद्रांचे पथक येण्याची वाट पाहिली जात आहे. …

Read More »

चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदीर का नाही झाले ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव हेमंत टकले यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी चार वर्ष सत्तेत आहात मग कोणी थांबवलं होतं कायदा करायला आणि राममंदीर बनवायला. शिवसेना आणि भाजपचे लोक विषय संपवण्याचा विचार करत नाही तर तो विषय तसाच भिजत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरुन लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करता येईल असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आमदार हेमंत टकले यांनी …

Read More »

महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारु दे लालबागच्या राजाकडे दादा-ताईंचे साकडे

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्राची आर्थिक,सामाजिक परिस्थिती सुधारु दे असे साकडे लालबागचा राजाला घातले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर सिध्दीविनायकाचेही दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय भावंडे अशी ओळख असलेले विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि खासदार …

Read More »

अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केले स्वागत

मुंबईः प्रतिनिधी नवी मुंबईमधील अल्पसंख्यांक समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक, नसीम सिद्दीकी …

Read More »

विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे यादी प्रसिध्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा बोंडअळी, तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत देत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

नागपूर : प्रतिनिधी मागील अधिवेशनात घोषणा करूनही राज्यातील बोंडअळी, तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. तसेच याप्रश्नी जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्याशिवाय सभागृह सोडणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार रात्री १२.३० वाजेपर्यंत विधानसभा रोखून धरल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज …

Read More »