Tag Archives: badlapur

बदलापूर प्रकरणी काँग्रेसचा मंत्रालयावर धडक मोर्चा विजय वडेट्टीवार यांची टीका, महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स

महायुती सरकार एसआयटी सरकार आहे. कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते. परंतु कारवाई केली जात नाही. महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स आहे अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली. त्याचबरोबर बदलापूर प्रकरणात एसआयटी नेमली तरी न्याय मिळेल का? असा संतप्त सवाल …

Read More »

सुप्रिया सुळे यांनी विनंती, माझी सुरक्षा काढून घ्या… ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी द्या

मागील काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलंय. बदलापूर येथील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. दरम्यान, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहलंय. या पत्रात त्यांनी माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा, अशी विनंती केली. सुप्रिया सुळे पुढे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, बाहेरचे लोक इतक्या जलद गतीने गाड्या भरून बदलापूरात बदलापूरचं आंदोलन राजकिय हेतूने प्रेरित

बदलापूरात दोन लहान चिमुरडींवर शाळेतील शिपायानेच बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर काल समस्त बदापूरवासियांनी आदर्श शाळेसमोर आणि बदलापूर रेल्वे स्थानकासमोर दिवसभर आंदोलन केले. या आंदोलनाची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालविण्यात येणार असल्याचे कालच जाहिरही केले. मात्र आज मुख्यमंत्री शिंदे यांनी भलतेच …

Read More »

बदलापूर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडप; आंदोलक आपल्या मागणीवर ठाम मंत्री गिरीष महाजन, राज्य सरकारच्या आवाहनानंतरही आंदोलक आक्रमक

शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर बदलापूरातील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच बदलापूर स्थानकात ठिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हटविण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरु केली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळू नये या उद्देशाने पोलिसांनी माघार घेतली. त्यानंतर राज्य सरकारचे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार

बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील …

Read More »

दोन लहान मुलींवरील बलात्काराच्या घटनेवरून बदलापूरकर आक्रमक; रेल रोको आंदोलन सकाळपासून सुरु झालेले आंदोलन संध्याकाळ होत आली तरी सुरुच

दोन लहान शाळकरी मुलींवर शाळेतील शिपायाने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेवरून आज बदलापूरकर चांगलेच आक्रमक झाले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असली आरोपीला तात्काळ फाशी द्या या मागणीवरून बदलापूर रहिवाशी आक्रमक झाले. सुरुवातीला आंदोलक जमावाने ज्या शाळेत हि घटना घडली, त्या शाळेसमोर आंदोलकांनी आंदोलन सुरु केले. या घटनेमुळे …

Read More »

उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील पूरबाधितांविषयी निर्णय घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील नदीच्या दोन्ही बाजूच्या पूर बाधितांविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. मात्र, त्याचवेळी भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा येणार नाही, हे सुद्धा सुनिश्चित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कुळगाव-बदलापूर उल्हास येथील नदीवरील पूर नियंत्रण रेषेबाबत निगडित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

बदलापूर आणि अंबरनाथच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ‘हे’ आदेश कुळगांव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेर सर्वेक्षण आणि शाळा हस्तांरणासाठी निधी देणार

कुळगांव- बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेर सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यासोबतच कोविड काळातील केलेल्या खर्चाचे व नगरपरिषदेला मुद्रांक शुल्काचे अनुदानही लवकरात लवकर दिले जावे यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. कुळगांव – बदलापूर नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री …

Read More »

आणखी दोन स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मुंबईवरून येणाऱ्यांवर बंदी अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी काढले आदेश

मुंबई: प्रतिनिधी ज्या मुंबई शहरात मिळणाऱ्या रोजगाराच्या जीवावर मुंबईच्या आजूबाजूला शहरे वसली आता त्याच लहान-मोठ्या शहरांकडून उपनगरातून मुंबईमध्ये कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्याचे सत्र सुरु केले. काल कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांनी अशा आशयाचे पत्रक काढल्यानंतर आता अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी असे पत्रक काढत ८ मे पासून परतणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. …

Read More »