मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष …
Read More »कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे राज्यात जनआंदोलन दोन कोटी सह्यांचे निवेदन पक्षाध्यक्ष सोनिया गांधींच्या मार्फत राष्ट्रपतींना सादर करणार
नाशिक- मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळला व आंदोलन केले. हे कायदे आणून शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे …
Read More »महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवायचं नाशिक एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट, बोट क्लब, खारघर येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यातील पर्यटनस्थळे, तिर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्वाचे …
Read More »देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा प्रयत्न महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी आणि कामगारांना उद्धवस्त करणारे कायदे आणले आहेत. हे कायदे आणून देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. हे शेतकरीविरोधी कायदे रद्द होईपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतक-यांसोबत मिळून संघर्ष करतील, असा इशारा …
Read More »मराठा समाजातील असंतोष दूर करण्यासाठी राज्य सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय साडेतीन तासाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर
मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधीज्ञ यांच्यासोबत केलेल्या चर्चेनुसार राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरीम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे …
Read More »शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा भाजप सरकारचा डाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकार गेल्या सहा वर्षापासून शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी संसदेचे नियम व लोकशाही पायदळी तुडवून कृषी विधेयके मंजूर करून नरेंद्र मोदी सरकार या देशातील शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यामुळे कृषीक्षेत्रात कंपनीराज येणार असल्याची टीका …
Read More »शेतकऱ्यांसाठीही ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी ई–पीक …
Read More »…. ही तर फडणवीसांची बौद्धीक दिवाळखोरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी स्व. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाचा कारकिर्दीनंतर डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली, ज्यांच्या १० वर्षाच्या काळात भारताचा सरासरी विकास वाढीचा दर ७.५ टक्के राहिला त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धीक …
Read More »कांदा निर्यातबंदी रद्द करेपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरुच राहिल ! काँग्रेसच्या आंदोलनाला राज्यभर प्रचंड प्रतिसाद
मुंबई: प्रतिनिधी कोरानाच्या संकटात झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत असताना मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. कांद्याला बाजारात चांगला भाव मिळत असताना अचानक निर्यातबंदीचा निर्णय घेऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. केंद्र सरकार …
Read More »या आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात घोषणा
मुंबई : प्रतिनिधी सन २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये २६ जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, परंतु ८ जिल्ह्यातील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती …
Read More »
Marathi e-Batmya